जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

22 December 2023

ऋतुजा पाटील ठरली 'महाराष्ट्राचा महावक्ता'

भोकर - येथील शाहू परिवार आयोजित *'कै मा.आ. बापूसाहेब दे गोरठेकर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत'* संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय धुप्पा, जि नांदेड येथील कु. ऋतुजा पाटील हिने 'महाराष्ट्राचा महावक्ता' बनण्याचा बहुमान पटकावला असून तिला एकतीस हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक मिळालं आहे. स्पर्धेचा विषय 'आरक्षणामुळे सामाजिक व आर्थिक समस्या सुटतील काय?' असा होता. या स्पर्धेत दुसरे पारितोषिक भोकरच्या कु.धनश्री कदम तर तिसरे पारितोषिक गडहिंग्लजच्या पाटील संकेत कृष्णात शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज जि. कोल्हापूर यास दिले गेले स्पर्धेच्या सांघिक गटातून फिरता चषक राजर्षी शाहू महाविद्यालया लातूरच्या स्पर्धकांना मिळाला आहे. 

मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे शाहू परिवाराने केलेले उत्कृष्ट नियोजन! विद्यार्थ्यांसोबतच अनेक नामवंत मंडळींच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अतिशय व्यापक प्रमाणावर पार पडला. आजच्या टीव्ही आणि मोबाईलच्या काळात शाला-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा वैचारिक जागर निश्चित उपयुक्त ठरेल असे मत शाहूचे प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांनी व्यक्त केले. दै देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी बी आर पांचाळ, दै सकाळचे तालुका प्रतिनिधी बाबुराव पाटील, साहित्यिक चंद्रकांत चक्रावार यांनी सतत दोन दिवस परीक्षण करून निःपक्षपाती निकाल दिला. 

स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव पा किन्हाळकर होते.प्रमुख पाहुण्यामध्ये माजी .प. स. सभापती शिरीषराव गोरठेकर,माजी . सभापती जि. प. नांदेड प्रकाशराव भोसीकर, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर जगदिश भोसीकर,माजी सभापती जी. प. नांदेड बाळासाहेब रावनगावकर, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लामकानीकर,नूतन विद्यालय उमरी चे सचिव तथा संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड कैलासभाऊ गोरठेकर, संस्थथेचे पदाधिकारी यां सगळ्यांनी सर्वांचे मनापासुन अभिनंदन केले. पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती शाहूचे प्राचार्य संजय देशमुख यांनी दिली आहे.याकमी शाहू परिवाराच्या,उत्कृष्ट नियोजनाने,सर्वच सदस्यांनी अपार मेहनती ने कार्यक्रम यशस्वी करून दाखविला असे मत विजेत्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बालाजी काळवणे यांनी केले तर सुरेख सूत्रसंचालन जोंधळे राहुल, चव्हाण निलेश यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य संजय देशमुख यांनी मानले.

0 comments:

Post a Comment