जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

15 December 2023

भोकर येथील विश्वकर्मा योजना नावनोंदणी महामेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-गणपत पिट्टेवाड


१७ डिसेंबर रोजी भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर आयोजित नावनोंदणी शिबीर व महामेळाव्यास नांदेडचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार…
भोकर : भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर यांच्या वतीने दि.१७ डिसेंबर रोजी माऊली मंगल कार्यालय भोकर येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभ घेण्यासाठी नावनोंदणी शिबीर व मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांसह आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.तरी या मार्गदर्शन महामेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड पोमनाळकर यांनी केले आहे. 

बारा बलुतेदारांना रोजगार मिळावा,उद्योग क्षेत्रात भरारी घेता यावी यासाठी प्रभावी नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार,दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता माऊली मंगल कार्यालय भोकर येथे भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर च्या वतीने नावनोंदणी शिबिर व मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीर व महामेळाव्याचे उद्घाटन नामदार गिरीष महाजन हे करणार आहेत.तर याप्रसंगी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, संघटनमंत्री संजय कोडगे,आ.राम पाटील रातोळीकर,आ. भिमराव केराम,आ.तुषार राठोड,आ.राजेश पवार,माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील,संतुकराव हंबर्डे,दिलीप कंदकुर्ते,देविदास राठोड, प्रणिताताई चिखलीकर,राजा खंडेराव देशमुख,बाळा साकळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या नावनोंदणी शिबिर व मार्गदर्शन महामेळाव्याचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थिती रहावे,असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा उत्तर चे जिल्हाध्यक्ष गणपत पिट्टेवाड यांनी केले असून सदरील नावनोंदणी शिबिर व मार्गदर्शन महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी त्यांच्यासह ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष साहेबराव राठोड,संतोष मारकवार, माऊली पाटील चिंचाळकर,शिवाजी पाटील जाधव,रमेश मटकमवार,माधव पाटील शिंदे,श्रीकांत पाटील किन्हाळकर,नंदु ऱ्याकावार,बालाजी वाघमारे यांच्यासह भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

0 comments:

Post a Comment