भोकर- येथील अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी पोलिस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाने कंबर कसली असून दररोज कार्यवाहीचा धडाका सुरू आहे काल दिनांक 15 डिसेंबर रोजी प्रतिबंधित गुटखा विक्रीस जाताना पकडला आणि कार्यवाही केली मात्र ज्यांची नियुक्तीच मुळात घातक अन्नपदार्थ विरोधातील कार्यवाहीसाठी आहे तो विभाग मात्र अद्यापही कोमात असल्याने यातले गौडबंगाल काय असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे
बिघडते सामाजिक स्वास्थ्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने गुटखा पानमसाला सदृष्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली मात्र शेजारील राज्यातून छुप्या मार्गाने गुटखा येतो आणि भोकर सह अन्य शहरातही करोडो रुपयांचा गुटखा साठवून तो विक्री केला जातो. संबंधित अधिकाऱ्यांचे आशीर्वादाशिवाय इतक्या उघडपणे गुटखा विक्री होऊ शकणार काय,? असा सवाल उपस्थित होत आहे.
व्यसनाधीनतेमुळे देशाचा कणा असलेली तरुणाई पोखरली जात असून अलीकडे कर्करोगाचे प्रमाणही सपाट्याने वाढत आहे अनेकांना तर तारुण्यातच संपवले मात्र अन्न व औषधी प्रशासनाचे आशीर्वादाने अजून किती तरुणांना कर्करोगाने संपवले जाणार हे काळच ठरवेल. भोकर शहरात आणखी काही महाभाग असेच आपले दुकान चालवत आहेत यांच्याही मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना सामोर यावे लागणार आहे तरच या विभागाच्या कथीत अधिकाऱ्यांची महिने”वारी” बंद होईल. आज मितीस पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, हे सध्या ॲक्शन मोडवर असून “नो ॲडजस्टमेंट ओन्ली ॲक्शन” अशी भुमिका घेत अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडल्याने गुन्हेगारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच वर्षानंतर नागरिकात पोलिसांचे कौतुक होत असताना पहावयास मिळते.
वास्तविकपणे सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नाठाळाच्या माथी वेळीच काठीचा घाव घालण्यासाठी शासनाची संबधित व्यवस्था नियुक्त असते परंतु ही व्यवस्था आपल्या पदाचा दुरुपयोग करुन श्रीखंड खाण्यासाठी करत असेल तर अपेक्षा कोणाकडून कराव्यात? हा यक्ष प्रश्न समोर आला आहे. अश्याच भ्रष्ट आधिकारी व कर्मचारी यांच्या हातमिळवणीतून, तालुक्यातील काल-परवाचे , कोपऱ्यातील पान टपरी चालक, नर्डेवाले, जत्रेतील गुडगुडीवाले आज करोडोंचे मालक, उंच माडीवाले गाडीवाले झाले असल्याचे दिसून येत आहेत. यात आधिकारी, कर्मचारी व व्यावसायीक मालामाल झाले परंतू कित्येकांचे संसार तुटले, देशोधडीला लागले तर तंबाखूजन्य गुटख्याने कित्येक कर्करोगासारख्या *जीवघेण्या* आजाराने बळी गेले त्याचे काय? शासन यासाठीच यांची नियुक्ती केली आहे का? असा सवाल उपस्थित होण्यावाचून रहात नाही. भोकरच्या दोन दबंग अधिकाऱ्यांनी
लोकहितासाठी राजकीय नेते व प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात मैदानात उडी घेऊन आपल्या अधिकाराच्या कक्षेत कारवाईचा तडाखा सुरू केल्याने प्रथमच भोकर तालुक्यातील नागरिकात पोलिसांबद्दल विश्वासहर्ता वाढली आहे. दरम्यानच्या काळातील पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.







0 comments:
Post a Comment