जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

27 December 2023

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती निमीत्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

भोकर – क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १४८ व्या जयंती निमित्त उद्या दिनांक २८ डिसेंबर रोजी प्रा. डॉ. कमलताई फोले यांच्या अध्यक्षतेखली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कमलताई फोले (वाणिज्य विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर) तर उद्घाटक संतोषजी टारपे (माजी आमदार, कळमनुरी) तसेच अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन देखील यादरम्यान होणार आहे.
जयंती सोहळ्याच्या नियोजन करण्याचे उद्देशाने दिनांक २५ रोजी डॉ. उत्तम वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी समाज बांधवांनी या जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. कमलताई फोले तसेच जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले.
“क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा” यांच्या १४८ व्या जयंती सोहळ्याची सुरुवात येथील बिरसा मुंडा चौक मुदखेड रोड येथून मूळ आदिवासी पारंपारीक व सांस्कृतिक प्रदर्शन मिरवणुकीने होणार असून यातील मुख्य आकर्षण म्हणजे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, किनवट तालुक्यातील पारंपारिक मूळ आदिवासी ढेमसा नृत्य, आदिवासी दंडार नृत्य व महिलांचे सांस्कृतिक कलाप्रदर्शन असणार आहे तसेच माऊली मंगल कार्यालयात आदिवासींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी माजी सभापती शिवाजीराव देवतुळे, डॉ. अशोक माजळकर (जिल्हाध्यक्ष, अनुसूचित जमाती, नांदेड विभाग), माधवराव माजळकर (माजी सरपंच, समंदरवाडी), धोंडीबा भिसे (मा. संचालक, कृ. उ. बा. समिती, भोकर), हनुमंत वागतकर ( वाहतूक नियंत्रक, एस. टी. डेपो, भोकर), संजय धनवे (कोषाध्यक्ष), श्री शेषराव हुरदुके, आमदरी, श्री मारुती वागतकर, श्री रंगराव वागतकर, श्री राजू बुरकुले तसेच सौ. संध्याताई भुरके, श्रीमती अनुराधाताई मेंडके, सौ. सरस्वती भिसे, सौ. रुक्मीना पांडेवाड, सौ. प्रेमलता धनवे, सौ. भाग्यलक्ष्मी तायवाडे, श्रीमती सुनिता कोतवाल, सौ. शकुंतला वागतकर, सौ. सुमन डोखले, सौ. अंबिका वागतकर व शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह भोकर येथील सर्व विद्यार्थिनी यांचींही यावेळी उपस्थिती होती.

0 comments:

Post a Comment