भोकर (प्रतिनिधीः)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पग्रामगीताच खऱ्या अर्थाने गावाला स्वयंपूर्ण बनवू शकते. तेव्हा गावातील प्रत्येक घराघरात ग्रामगीतेचे विचार पोहचुन त्याप्रमाणे आचरण करावे असा मौलिक संदेश कोंडल्य आश्रमाचे महंत श्री चैतन्यजी महाराज यांनी भोकर तालुक्यातील मौजे कांडली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला.
यावेळी मोझरी येथील श्रीमती निर्मलाताई, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, मा. उपसभापती सुभाष पाटील कोळगावकर, सरपंच कमाजी पेनलोड, उपसरपंच गणेश डुमलवाड,राष्ट्रीय कीर्तनकार गंगाधर गिरोड गुरुजी, बापूराव पाटील सोनारीकर, गंगाप्रसाद जामदरीका, पत्रकार बालाजी नालेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पुढे मार्गदर्शन करताना महंत चैतन्य महाराज यांनी सांगितले की भारत देश हा गावागावातून वसलेला असल्याने अगोदर गावाची सुधारणा होणे ही काळाची गरज आहे हे राष्ट्रसंतांनी हेरले. गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा। गावची भंगता येईल अवदसा। देशाशी ।। ही जाणीव राष्ट्रसंताना होती म्हणून त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन माणसांना सुसंस्कारी बनवण्यासाठी
भजने, कीर्तन, प्रवचने करुन जनजागृती केली. मानवाच्या व गावाच्या उद्धारासाठी त्यांनी मौलिक अशी पग्रागीता लिहून आपल्या उद्धारासाडी ठेवलेली आहे. तेव्हा प्रत्येक गा- वागावात या ग्रामगीतेचे वाचन हाले पाहिजे व त्या विचाराचे अनुकरण करून आपले गाव आपण तीर्थ बनवले पाहिजे असे सांगून आई- वडिलांनी लहानपणापासूनय आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत, कोणालाही व्यसनाकडे कळू देऊ नये, प्रत्येकाला जीवन शिक्षण देऊन त्यांना घडवावं असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी ही आपले विचार व्यक्त करून राष्ट्रसंतांच्या विचाराची आजही खन्या अर्थान समाजाला गरज असल्याचे सांगितले..







0 comments:
Post a Comment