जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 November 2023

बोरगाव सरपंच पदी सौ. रायभोळे यांची बिनविरोध निवड

भोकर प्र: तालुक्यातील बोरगाव (सुद्धा)येथे सरपंच सौ. आशाताई संतोष गागदे यांनी राजीनामा दिल्या मुळे दि.८ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव येथे पिटाशीन अधिकारी श्री कंधारे, ग्रामसेवक सौ. नुनंचे यांच्या उपस्थितीत सौ. धम्मशीला दिलीप रायभोळे यांची सर्वानुमते सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी पोलीस जमादार भीमराव राठोड, व पोलीस पाटील कापसे यांची उपस्थिती होती.
प्याॅनल प्रमुख गीतेश बोटलेवाड, दत्ता दिगांबर सूर्यवंशी यांच्या समवेत उपसरपंच दत्तात्रय केदोबा दसरवाड, सदस्य, सुभाष दिगांबर पुरी, प्रदीप संभाजी जाधव सौ. कलावतीबाई लाला हुबेवाड, सौ. सविता बालाजी मुपरवाड, सौ वंदना उमेश पुरी, माजी सरपंच सौ.आशाताई संतोष गागदे, सौ. किसनाबाई शंकरराव लुंगारे यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित सरपंच सौ. रायभोळे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील लुंगारे,पुंडलिकराव कांबळे, माधव सूर्यवंशी, दिलीप रायभोळे, दत्ता सूर्यवंशी, शिवानंद शिंदे, संतोष गागदे, बंडू चिट्टेबोईवाड, उमेश पुरी, आनंद कांबळे, बाळू बोटलेवाड, बंडू कोंडापल्ले, मारोती हुबेवाड (माजी सरपंच )गोपीनाथ सूर्यवंशी, मारोती गंगाराम हुबेवाड आदींची उपस्थिती होती

0 comments:

Post a Comment