जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

22 November 2023

विजेचा धक्का लागून रेणापूरच्या आदित्य भगत या युवकाचा मृत्यू

भोकर : तेलंगणा राज्यातील भैंसा मंडलच्या कुंडसर गावात काल (दि २१.)बुधवारी रात्री झालेल्या विद्युत अपघातात भोकर तालुक्यातील मौजे रेणापुर येथील एक तरुण ठार तर तीन जण जखमी झाल्याची हृदय द्रावक घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. 

अधिक वृत्त असे की, तालुक्यातील रेणापूर येथील रोहिदास जाधव, आकाश भगत, आदित्य पवन भगत आदी चारजण जनावरांसाठी चारा आणण्यासाठी भैंसा मंडळाच्या कुंडसारा येथे गेले होते. एका शेतकऱ्याकडून भात चाऱ्याच्या पेंढ्याचे गठ्ठे विकत घेऊन व्हॅनमध्ये येत असताना कुंडसरा गावात विजेच्या तारेची स्पारकिंग त्या टेम्पोतील चाऱ्याला आग लागली. पाण्याने ती आग विझवताना पाण्यासोबत विजेचा धक्का लागून आदित्य पवन भगत याचा जागेवरच मृत्यू झाला तर रोहिदास जंगवाड, आकाश भगत हे जखमी झाले होते. स्थानिकांनी जखमींना तातडीने १०८ वाहनातून भैंसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी आदिनाथला मृत घोषित केले तर जखमी रोहिदास, आकाश व शंकरराव यांना प्रार्थमिक उपचारानंतर घरी जाण्यास सांगीतले.

   सदर वार्ता गावात कळताच भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी गावकऱ्यांसोबत तात्काळ भैंसा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन जखमी रुग्णांची भेट घेऊन कालच भोकर येथे आधिक उपचारासाठी घेऊन आले. मयत आदित्य यांचे शव विच्छेदनाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर रेणापूर येथे आदित्य वर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आदित्य हा आईवडिलांना एकुलता एक होता असेही कळते. या घटनेमुळे रेणापूर गाव परीसरात शोककळा पसरली आहे.

0 comments:

Post a Comment