जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 August 2024

साहेब, तुम्ही खरंच कोणत्या पक्षात? एकाच घराण्याचे नेतृत्व नको

बिलोली:महाराष्ट्राचे राजकारण सोबतच गेल्या तीन-चार महिन्यात नांदेड जिल्ह्यात अनेक घटना घडामोडी घडल्या. पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदलली. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली. अशोकराव चव्हाण यांनी आपल्यासोबत अनेक पदाधिकारी, नेतेमंडळींना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रमुख नेता उरला नव्हता. परंतु लोकसभेला मतदारांनीच काँग्रेसचा प्रचार करून नांदेडची जागा खा.वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसला मिळवून दिली. सध्या अशोकराव चव्हाण यांचे मित्र, विश्वासू सहकारी स्व.आ.रावसाहेब अंतापुरकर यांचे सुपुत्र देगलुर बिलोली चे आमदार जितेश अंतापुरकर हे कोणत्या पक्षात आहेत, यावरून चर्चा होत आहे. मात्र त्यांनी मी काँग्रेसमध्ये असल्याचे सांगितले आहे. मात्र जिल्हा काँग्रेस कमिटीने सरळ शब्दात सांगितले आहे की अंतापुरकर हे कोणत्या पक्षात आहेत त्यांनाच माहिती असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी सांगितले की अंतापुरकर यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न च येत नाही येणाऱ्या काळात कोणत्या पक्षात राहतील अशी चर्चा नागरिकांमधून जोरदार सुरू आहे. त्यात मतदारसंघांतील नागरिक आपण ज्यांना निवडून दिलो ते जर निवडून आल्यानंतर त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात जात असतील तर काय म्हणून आम्ही निवडून द्यायचं असा काही रोष नागरिकांमधून व्यक्त होत आहे.तसेच भाजप नेते तथा खा.अशोक चव्हाण यांच्या समवेत भेटी घाठी घेत आहेत व ते खा.चव्हाण यांचा हात धरतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे.त्यामुळे साहेब, तुम्ही खरंच कोणत्या पक्षात आहात, अशी कुजबुज होत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काही मतदारसंघामध्ये नेत्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्याच नातेवाईकांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना आता आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का? असा विचार त्यांच्या मनात येत आहे. ज्यांनी अनेक वर्षे मतदारसंघावर राज्य केले, त्यांच्याच घरातील मुलाबाळांना उमेदवारी मिळणार असेल तर आम्ही कधी निवडणूक लढवायची असा प्रश्न विचारला जात आहे. नेत्यांनी मोठे मन करून कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, अन्यथा कार्यकर्ते काहीही करू शकतात, अशी कुजबुज ऐकावयास मिळत आहे.

0 comments:

Post a Comment