जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 August 2024

साहेबांना आता वेळच वेळ, दलबदलू नेत्यांना धडा शिकवू सामान्य जनतेच्या भावना

बिलोली:देगलुर- बिलोली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. दीड, दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. उमेदवार घोषित होतील तेव्हा होतील, पण आतापासून मतदारसंघ पिंजून काढण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. विशेषता विद्यमान आमदार तर मतदारांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. ज्यांच्या भेठी घेण्यासाठी बंगल्यातून खाली येई पर्यंत तासनतास मतदारसंघातील सामान्य जनता बसून रहायची त्या आमदार साहेबांकडे आज घडीला कोणतेही काम घेऊन जा, आमदार महोदय ते काम करण्यासाठी तत्पर राहत आहेत. एवढेच नाही तर मी पुन्हा निवडून आल्यास तुमचे काम शंभर टक्के करतो, असे आश्वासनही देत आहेत. गेली अडीच वर्ष साहेबांना वेळ नव्हता, आता मात्र वेळच वेळ असल्याची कुजबुज ऐकावयास मिळत आहे. अडीच वर्षाच्या काळात कधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या अभिवादन चे बॅनर झळकले नाही मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या वेळेस बॅनर च बॅनर झळकले,सध्याच्या राजकारणात निष्ठा उरली नाही, असे लोक म्हणत आहेत. कारणही तसच आहे निवडणुकीच्या काळात आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, यासाठी वाट्टेल ते करण्यास अनेकजण तयार आहेत. अनेक वर्ष एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी एका रात्रीतून दुसऱ्या पक्षाचा झेंडा फडकावण्यास हे तयार असतात. त्यामुळे स्वार्थी राजकारणी नेत्यांची संख्या जागोजागी दिसून येत आहे. अशा नेत्यांना मतदार ओळखून असते. परंतु, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही एकनिष्ठ कार्यकत्यांची, नेत्याच्या भावना लक्षात घेणे गरजेचे आहे. अनेक दिवस पक्षासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी राबायचे अन् दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना ऐनवेळी संधी द्यायची, अशी प्रथा निर्माण झाली आहे. दिवस रात्र ज्या नेत्याला निवडून आण्यासाठी जे कार्यकर्ते मेहनत घेतली त्यांना मात्र आमदारांनी कधी कोणत्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली नाही.ज्यांनी मेहनत घेतली ते राहिले बाजूला मात्र हौशी कार्यकर्ते  घेऊन मिरवण्याचा एक नवीनच प्रकार पहावयास मिळत आहे.त्यामुळे अशा दलबदलू नेत्यांना धडा शिकविला पाहिजे, अशी कुजबुज जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

0 comments:

Post a Comment