रमज़ान महिन्यात लोडशेडिंग होऊ नये मुस्लिम समाजाची मागणी
बिलोली:आजपासून मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान सुरु होणार आहे त्या निमित बिलोलीत मुस्लिम समाजाचा वतीने विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी व सम्बंधित अधिकारीऱ्याना देण्यात आले.देशात कोरोना महामारीमुळे देश फार
संकटात आहे तर कोरोना वायरस चा प्रादुभाव वाढल्याने यावेळी मुस्लिम समाज यावेळी रमज़ान आपल्या घरात नमाज पटन करीत आहे व उपवास (रोजा)ही आपल्या कुटुंबा सोबत घरिच सोडनार आहे. दि.24 एप्रिल 2020 रोजी बिलोली येथील मुस्लिम समाजाचा वतीने दिनांक 25 पासुन पवित्र रमज़ान महिन्यात खाली दिलेल्या विविध मागण्या दररोज नियमित घंटागाडी सपूर्ण शहरात येणे, नियमित पाणी पुरवठा करने,सर्व मशीदेच्या समोरील परिसर स्वच्छ ठेवणे,ज्या ठिकाणी विद्युतखांब बंद पडलेले आहे त्वरिक्त दुरूस्त करून चालू करने,मध्यवर्ती बैंक ते कुंडलवाडी क़ुरैशी गल्ली नवीन बसस्थानक पासून मोठी मस्जिद पर्यतचे काही डिवाइडर वरील बंद आहे ते चालू करने,बिलोली शहरात वार वार विज खंडित होत आहे ज्यामुळे लॉक डाऊन मुळे नागरिक घरात असल्यामुळे त्यांना खुप त्रास होत आहे पवित्र रमज़ान महिन्यात एक महीना लोडशेडिंग करू नेय,शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुतरे,व डूकरे या जनावरा चा बंदोबस्त करावा अश्या विविध मागण्या संदर्भातचे निवेदन तहसीलदार,मुख्याधिकारी, म.रा.वी.वि.कंपनी अभियंता, पोलीस निरीक्षक व नगराध्यक्षा यांना देण्यात आले यावेळी मौलाना अहमद बेग ईमाम जामा मस्जिद ,मौलाना मुबीन बेग ईमाम, शेख फारुख अहेमद,वलियोद्दीन फारुखी,शेख सुलेमान,साजिद क़ुरैशी,शेख ईरशाद मौलाना आदिचे हस्ताक्षर आहे







0 comments:
Post a Comment