जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 April 2020

नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रूग्ण

नांदेड | नांदेडकरांनो शहरात दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे . आता सर्व शहर वासियांनी जास्त दक्षता घेत लॉकडाऊन १०० टक्के पाळण्याची गरज आहे . एकूणच दुसरा रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे . प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांच्या नेतृत्वात अत्यंत तातडीची बैठक बोलावली असून या नवीन कोराना रुग्णासंदर्भाने काय काय उपाय योजना करण्याची गरज आहे . त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंथन सुरू आहे .काही दिवसांपुर्वी एक चार चाकी गाडी चालक प्रवाशांना घेवून तीन राज्यांचा प्रवास करून त्यांना सोडून आला होता . त्यानंतर पुन्हा एकदा असेच घडले आणि तो पुन्हा एकदा तीन राज्य पार करून जाऊन आला . दुसऱ्यावेळेस परत आला तेंव्हा नांदेड पोलीस प्रशासनाने त्याला सिमेवरूनच क्वॉरंटाईन केले आणि त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले . आज आलेल्या स्वब नमुना अहवालामध्ये त्या चालकाचा स्वब पॉझिटीव्ह आला आहे . त्यामुळे त्याला क्वॉरंटाईन कक्षातून काढून शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाठविण्यात आले आहे . स्वब नमुन्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने एक बैठक बोलावली आहे . ही बैठक रात्री ९ वाजता सुरू झाली . या संदर्भाने हा चालक शहरात आल्यानंतर कोणा - कोणाला भेटला आणि काय - काय त्याचा संपर्क इतरांशी आला याचा शोध होईल . सोबतच आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोविड - १९ नियमावली नुसार ज्या भागातला हा व्यक्ती आहे त्या भागाला नियमाप्रमाणे तीन किलो मिटरच्यावर्तुळ परिसरात कंटेनमेंट झोन निर्धारीत करावा लागेल . त्या भागातील कोणीही व्यक्ती बाहेर जावू शकणार नाही आणि बाहेरचा व्यक्ती आत येवू शकणार नाही असाच एक अनुभव नांदेडकरांना कांही दिवसांपुर्वी आला होता . त्यानुसार त्या भागात सध्या कंटेनमेंट झोनमध्ये अत्यंत कडक शिस्तीत जाण्या - येण्याचा प्रबंध करण्यात येणार आहे .प्रशासन आपल्यावतीने मागील एक महिन्यापासून भरपूर मेहनत घेत आहे . पण जनतेची सुध्दा या संदर्भाने मोठी जबाबदारी आहे . ज्या भागातील हा कोरोना रुग्ण आहे . त्या भागात आता सर्वांची तपासणी होईल या आरोग्य तपासणीला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे . तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येईल नसता हा प्रकार असाच सुरू राहिल . आजपर्यंत आम्ही आनंदी होतोत . पण आता आमचा आनंदात विरजण पडले आहे . चार दिवसांपुर्वी सापडलेल्या कोरोना रुग्णाची आता संख्या दुसरा रुग्ण सापडल्यानंतर दुहेरी झाली आहे . या परिस्थितीत सुध्दा सर्वानी संयम राखून प्रशासनाच्या सुचनांना आपल्या प्रत्यक्ष अंमलात आणले तरच कोरोनाची झालेली दुहेरी वाढ पुढे रोखण्यात आम्ही यशस्वी होणार आहोत . नाहीतर येणाऱ्या आपत्तीपासून कोणीही रोखू शकणार नाही . दुसरा कोरोना रुग्ण छोटयाशा फायद्यासाठी दोनदा बाहेर जावून आला आणि आपल्यासोबत कोरोना घेवून आला . कालपासूनच रमजान महिन्याची सुरूवात झाली आहे या काळात सुध्दा छोट्यात छोट्या कार्यक्रमात सुध्दा सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज आहे . पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रमजान महिन्यातील कार्यक्रम सर्वांनी घरीच पाळलेले आहेत . असाच प्रतिसाद सर्वांनी देण्याची गरज आहे . कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनातील व्यक्ती झटत आहेत . पण त्यांच्या या झटण्याला खरे यश आपण दिलेल्या प्रतिसादानंतर येईल . आपण प्रतिसाद नाही दिला तो सुध्दा सोशल डिस्टंसिंग , घरात राहाणे , वारंवार हात धुणे याबाबींना तर नक्कीच कोठे तरी आमच्या शहरात आणि जिल्ह्यात एक मोठे संकट आकार घेणार आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही .

0 comments:

Post a Comment