बिलोली | तालुक्यातील चिटमोगरा येथे वादळी वारा व पाऊसासह गारपीट झाल्याने अनेक शेतकरयांच्या शेतीपिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे . या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे . बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली . या गारपीट व अवकाळी पावसामुळे अनेक पिके भुईसपाट झाले . तोंडाला आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने आज शेतकरी संकटात सापडला आहे . या गारपीटीमुळे रब्बीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून , गावातील अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघडय़ावर पडले आहे . या झालेल्या गारपीटीत टरबूज , भुईमूग , गहू , ज्वारी व भाजीपाल्यांसह फळबागांची नुकसान झाली आहे . सध्या जगभर चालु असलेल्या कोरोना या महामारीच्या संकटासमयी वादळी वारा व पाऊसासह गारपीट झाल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे . या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घरमालक यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
प्रतिनिधी:शुभम निदाने







0 comments:
Post a Comment