नांदेड , दि . 13 : - भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरीच साजरी करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे . मंगळवार 14 एप्रिल 2020 रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे . हा आनंदाचा दिवस आहे परंतु देशात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक त्रस्त आहेत . हा आजार संसर्गजन्य असून त्याची लागण होण्याची भीती असल्याने नागरिकांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हा दिवस साजरा न करता घरीच राहून तो साजरा करावा . जिल्ह्यात कलम 144 लागू केली आहेत तसेच संचारबंदी आहे . त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येणार नाही . सोबतच जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदासुद्धा लागू असून त्या कायदाची देखील पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांची आहे . सध्याची परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होवून फैलाव होण्याच्या भीतीमुळे , खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे . कोरोना साथ रोग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात मोठा समुदाय आला तर संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे . अशा वेळी सर्वांनी घरीच राहून कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्याची ही वेळ आहे त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे , असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे .
13 April 2020
Home »
» कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करावी - जिल्हा प्रशासनाचे आवाहन







0 comments:
Post a Comment