नांदेड दि . 16 : - उद्या शुक्रवार 17 एप्रिल रोजी सकाळी 7 . 30 वा नांदेड आकाशवाणी केंद्रवरुन जिल्हाधिकारी डॉ . विपिन यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे . नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना , वैद्यकीय सुविधा , कायदा सुव्यवस्था आणि इतर केलेल्या उपाययोजना , नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयीची माहितीपर मुलाखत प्रसारित होणार आहे . नांदेड जिल्ह्यासह परभणी , हिंगोली , उमरखेड , बीड , लातूर या जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच तेलंगणा या राज्याच्या सीमावर्ती भागातील काही भागांमध्ये ही मुलाखत नागरिकांना ऐकायला मिळणार आहे . सुमारे 40 लाख श्रोत्यांपर्यत आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम पोहोचत असून या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी आकाशवाणी नांदेड केंद्रवरुन संवाद साधणार आहेत . श्रोत्यांनी या संवादाचा लाभ घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे .
16 April 2020
Home »
» जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आकाशवाणीवरुन श्रोत्याशी साधणार संवाद







0 comments:
Post a Comment