नांदेड:– दीड महिन्यांपूर्वी नांदेड येथील संचखंड गुरुव्दारा येथे दर्शनासाठी आलेल्या पंजाब, हरीयाणा व दिल्ली येथील भाविकांना लॉकडाऊनमुळे अडकून पडावे लागले होते. यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली, असून ऐंशी टॅ्रव्हल्स नांदेडमध्ये सोमवार दि.27 रोजी नांदेड येथे दाखल झाल्या आहेत. जवळपास अडीच हजार यात्रेकरू नांदेड येथून पंजाबकडे सायंकाळी रवाना होणार आहेत.कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंघ घालण्यात आले आहत. त्यामुळे जवळपास तीन ते साडे तीन हजार यात्रेकरू नांदेड येथील गुरुव्दारा येथे दीड महिन्यांपासून अडकून पडले होते. या यात्रेकरूंना पंजाब येथे जाता यावे, यासाठी महाराष्ट्र व पंजाब सरकारने समन्वय साधत या यात्रेकरूंना गावी जाण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे मागच्या दोन दिवसांमध्ये 25 टॅ्रव्हल्समध्ये 900 यात्रेकरू पंजाबच्या दिशेने जाऊ शकले.उर्वरीत सर्व यात्रेकरूंना त्यांच्या मुळ गावी घेऊन जाता यावे, यासाठी पंजाब सरकारने खास ऐंशी गाडयांची व्यवस्था केली आहे. या सर्व गाडया नांदेड येथे सोमवारी सकाळी दाखल झाल्या आहेत. प्रत्येकी एका गाडीसोबत तीन ड्रायव्हर असून सर्व गाडयांवर दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पंजाब सरकारने सोबत दिले आहेत.संतबाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या कृपा आशिर्वादने नांदेडमध्ये अडकून पडलेल्या यात्रेकंरूसाठी जाण्याची व्यवस्था झाली असल्याची माहिती पत्रकार तथा नानकसाई फांऊडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी दिली
27 April 2020
Home »
» पंजाब सरकारने पाठविलेल्या ऐंशी टॅ्रव्हल्स नांदेडमध्ये दाखल







0 comments:
Post a Comment