जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 April 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु


नांदेड . 12 : - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचे जिल्ह्यात वितरण सुरु करण्यात आले असून सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्ये दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टान्स सिंगचे पालन करुन धान्यत प्राप्त करुन घ्यावे , असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कातलीन परिस्थिती विचारात घेता , लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यतवस्थेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांचा शिधा एकत्रितरित्या उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . या सुचनांमध्ये बदल करुन आता शासनाने असा निर्णय घेतला आहे . एप्रील , मे व जून 2020 साठी अन्नाधान्यारच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अंत्योदयकार्ड धारकांना 23 किलो गहू व 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्य , प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यरक्ती 2 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए . पी . एल . शेतकरी यांना प्रति व्यक्ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो ( सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो ) याप्रमाणे वाटप त्या - त्या महिन्यात करण्यात येणार आहे .एप्रील , मे व जून 2020 या तीन महिन्यात वरीलप्रमाणे नियमित अन्न धान्याचे वाटप झाल्यानंतर त्या त्या महिन्याात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यावस्थेतील पात्र लाभार्थ्यांना ज्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्यि प्रतिमाह 5 किलो तांदुळ ( मोफत ) त्याचबरोबर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रति सदस्य 5 किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे ( मोफत ) वाटप करण्याात येणार आहे . या दोन्ही प्रकारचे वाटप Pos मशीन मार्फत होणार आहे . सध्या नांदेड जिल्हयातील नायगाव , हदगाव बिलोली , नांदेड , मुदखेड , कंधार तालुक्यात मोफत तांदळाचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्यात चालु आठवड्यामध्ये मोफत तादुळाचे वितरण सरु होणार आहे . मोफत तांदुळ एपीएल शेतकरी लाभार्थी यांना मिळणार नाही याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्हीयातील सर्व स्वयस्तोधान्यि दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्हयातील पात्र लाभार्थ्यां ना धान्य वाटप करण्यायबाबत सूचना देण्यांत आलेल्या आहेत . नांदेड जिल्हययात एकूण 1 हजार 993 रास्ता भाव दुकानदार असून या सर्व रास्तण भाव दुकानदार यांना सर्व योजनेचे एप्रिलसाठी 24 हजार 206 मेट्रीक टन धान्यव सार्वजनिक वितरण व्य वस्थेवतर्गत लाभार्थ्यांनना वितरणासाठी उपलब्धी करुन देण्याजत आले आहे.दिनांक 12 एप्रिल 2020 पर्यंत माहे एप्रिल 2020 चे नियमीत अन्नत धान्या वितरण नांदेड जिल्हयातील 1993 रास्ति भाव दुकानदाराकडून अंत्योवदय योजनेचे 2025 . 85 , प्रा . कू . योजनेचे 5828 . 00 आणि केशरी ( शेतकरी ) योजनेचे 1294 . 62 असे एकुण 9 हजार 148 . 62 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थीयांना वितरण करण्याभत आले आहे . अन्न व नागरी पुरवठा ग्राहक सरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय दिनांक 9 एप्रिल 2020 मध्ये शासनाने असेही निर्देश दिले आहेत की , नोव्हेंल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल ( केशरी ) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील . अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना , एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्यां चे वार्षीक कौटुंबीक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे . अशा लाभार्थ्यांसाठी मे व जून 2020 या 2 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहु ( 8 रुपये प्रतिकिलो प्रमाणे ) , व तांदुळ 2 किलो ( 12 रु प्रतिकिलो प्रमाणे ) दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे .

0 comments:

Post a Comment