मुखेड: तालुक्यातील अनेक गावात मेघगर्जनेसह अवेळी पाऊस बरसल्याने खरब खंडगाव येथील दोन बैल ठार झाले तर अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे . दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली आहे . वीज कोसळल्याने खंडगाव येथील शेख खाजेसाब अहेमदसाब यांचे दोन बैल याची अंदाजे किंमत एक लक्ष 40 हजार रुपये तर नारायण व्यंकटराव पाटील यांचे रब्बीचे एक लक्ष रुपयाचे नुकसान तर अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . कोरोना विषाणूमुळे शेतात पिकलेला टरबूज , फळे भाज्या बाहेरगावी बाजारपेठेत नेण्यासाठी व्यवस्था नसल्याने व व्यापारी वर्ग घेऊन जाण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे . पिकांचे आर्थिक नुकसान झालेले असताना त्यातच बरसलेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे . नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे .
06 April 2020
Home »
» मुखेड : विज कोसळून खरब खंडगाव येथे दोन बैल ठार







0 comments:
Post a Comment