जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

13 April 2020

सोशल डिस्टन्सिंगचा बॅंकांसमोर फज्जा

बिलोली -कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न सुरु असतांनाच आज शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बॅंकांपुढे गर्दी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्स चा पूर्णत: फज्जाच उडाला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण निधी अंतर्गत अनेक नागरिकांच्या खात्यात 200, 500, एक हजार, दीड हजार रुपये जनधन खात्यात जमा करण्यात आले. व ते बॅंकेमध्ये गर्दी न करता सोशल डिस्टंन्स ठेऊन काढावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र असे न होता शहरातील sbi bank ,महाराष्ट्र बॅंक, तसेच ग्रामीण भागातील अनेक बॅंकेत नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती.बॅंक अधिकारी यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या वेळोवेळी सुचना करूनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिकांनी पैसे जमा झाले की, नाही हे पाहण्यासाठीच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्रच लॉकडाऊन केले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या नाही मात्र. तरीही बहुतांश लोक कारण नसतांनाही घराबाहेर पडत आहे. व विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत.अनेकांच्या जनधन खात्यात 500 रुपये जमा झाले आहेत. ते काढण्यासाठी गर्दी करत आहेत. पैसे काढण्याचे अनेक पर्याय असून देखील नागरिक बॅंकेतच गर्दी करत आहेत. नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी एमटीएम, क्‍युआर कोड,यासुविधांचा या काळात उपयोग करून गर्दी टाळावी.

0 comments:

Post a Comment