जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

22 April 2020

जीवनावश्यक वस्तूंच्या भाव अव्वाच्या सव्वा ; कृत्रिम टंचाई . . . ग्राहकांना भुर्दंड .. प्रशासनाचे दुर्लक्ष

बिलोली | Covid - 19 च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे भाव  सर्रास वाढविण्यात आले आहेत .यामुळे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत . साखर - तेल यासह सर्वच वस्तूसाठी पाच ते पन्नास रुपये अधिक मोजावे लागत आहेत . काही ठिकाणी कृत्रिम टंचाई केली जात आहे . साठेबाजी वाढत आहे . बंदी असलेला तंबाखूजन्य सूर्य छाप जर्दा पाच रुपयाला मिळतो पण तो पंधरा रुपयाला विकला जात आहे . अशा अनेक वस्तूंच्या किमती बाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. पण ना दाद . . . ना फिर्याद . . .सामान्य नागरिकांनाची पिळवणूक होत आहे.अशा दुकानदारावरहि प्रतिबंध करणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे लोकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली . या काळात जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली . परंतु दुकानदारांनी ग्राहकांना जादा दराने वस्तूंची विक्री करत आर्थिक पिळवणूक करण्यास सुरुवात केली आहे . साखर तेल संसारोपयोगी वस्तूचे भाव सर्रास पाच रुपये - दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत जास्तीची किंमत आकारणी केली जात आहे त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच यंत्रणा नाही त्यामुळे लोकांना ताळेबंदीत आर्थिक झळ सहन करावी लागत आहे . तंबाखूजन्य वस्तू विक्रीला बंदी आहे तरीही दुकानावर ते सहज उपलब्ध होतात यात सूर्य छाप जर्दा पाच रुपयाला मिळतो पण तो कृत्रिम टंचाईमुळे पंधरा रुपयाला विकला जात आहे . बिडी सिगारेट गुटका त्या सगळ्या वस्तूंना बंदी पण लपूनछपून जास्त किंमतीने विकली जाते . तालुकास्तरावर या जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना कायद्याचा चाप लावण्याची आवश्यकता आहे . ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय विदारक पण लोकांना नाईलाजास्तव जास्तीचे पैसे देऊन माल घ्यावा लागतो . जिल्हा व तालुका प्रशासन संचारबंदी काळात अतिशय कटाक्षाने काम करीत आहेत . लोकांना संचार प्रतिबंध करत असतात परंतु दुकानदारांच्या वाढत्या किमतीच्या विक्रीला मात्र अद्यापही प्रशासन स्तरावर पावबंध घालता आला नाही . त्यामुळे एकीकडे मजुरांना काम नाही तर तर दुसरीकडे दुकानावरून जास्तीचे पैसे देऊन वस्तू विकत घ्याव्या लागतात या नफेखोरी मुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे . तालुका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे व जास्तीची किंमत आकारण्यात येणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे . 

0 comments:

Post a Comment