नांदेड ः- सेलू येथून उपचारासाठी असलेली महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीनवर पोहचली आहे.परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राहणार्या एक साठ वर्षीय महिला आजाराने त्रस्त आल्याने तिच्यावर काही दिवस औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सेलू येथे आल्यानंतर त्या महिलेस सेलू येथून नांदेड येथे दि. 28 रोजी रेफर करण्यात आले होते. ती महिला नांदेड येथे उपचारास येण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन आली होती. उपचार सुरु असताना या महिलेचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.या महिलेचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्यानंतर नांदेडच्या प्रशासनाने परभणी प्रशासनाला माहिती देण्यात आली, त्यानुसार संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी खबदारीची उपाययोजना म्हणून सेलू या शहरात तीन दिवस कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक बाबीशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.







0 comments:
Post a Comment