नांदेड दि . 22 : - जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी दिली आहे . देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे . केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने 15 एप्रिल रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील कृषि शेतमालाची खरेदी - विक्री व कृषि शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यास परवानगी दिली आहे . त्यानुसार सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव ( पणन ) यांनी 17 एप्रिल रोजी भारतीय कापूस निगम ( ccl ) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित ( MSCCGMP ) मुंबई यांच्यामार्फत कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत . त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी मंगळवार 21 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी दिली आहे . शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनाने दिलेल्या ऑनलाईन लिंकवर 25 एप्रिल 2020 पर्यंत प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे . त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार असून लघुसंदेशामध्ये नमूद दिनांकास शेतकऱ्यांने सात बारावरील पीकपेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधीत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे . एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही . Non FAQ दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे . कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक पुणे यांनी तालुकास्तरावर तालुका उप / सहायक निबंधक , सहकारी संस्था , कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी व बाजार समितीचा सचिव यांनी समिती गठीत केली आहे . शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर साथसोवळे सामाजिक अंतर ( Social distance ) व स्वच्छतेचे पालन करुन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आवाहन , सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे .
22 April 2020
Home »
» साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे , स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रांतर्गत सर्व कापूस खरेदी केंद्रास परवानगी







0 comments:
Post a Comment