देगलुर:शहरातील जुना बस स्थानक जवळील एसबीआय शाखेचे एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम पळविण्याचा अज्ञात चोरट्यांकडून प्रयत्न केला . सदरची घटना रविवारी 2 च्या सुमारास घडली . याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे संपूर्ण पोलिस यंत्रणा सध्या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे . सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे . त्यामुळे लोकांची रस्त्यावरील संख्या कमी झाली आहे . याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी आपला मोर्चा आता एटीएमकडे वळविला आहे . जुन्या बस स्थानकाजवळ ओम प्रकाश पेंडकर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये एसबीआय शाखेचे एटीएम मशीन आहे . सदरचे एटीएम मशीन बेंगलोर बेकरी व जुन्या बसस्थानकाची संरक्षण भिंत यांच्या बोळीत आहे . या छोट्याशा रस्त्याचा गैरफायदा घेत रविवार दि . ५ एप्रिल रोजी दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सदरील एटीएम मशीनची नासधूस व तोडफोड करून आतील रक्कम पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला . घटनेची माहिती मिळताच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले मात्र कोणताही सुगावा लागला नाही . याप्रकरणी चॅनल मॅनेजर बालाजी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380 , 457 , 511अन्वये अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकूर करीत आहेत .
07 April 2020
Home »
» देगलुर : संचार बंदीचा गैरफायदा घेत देगलूरात चोरट्या कडून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न







0 comments:
Post a Comment