जनतेनेही ७ सूचनांचे पालन करून लढाईत सहभागी व्हावे करोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सकाळी जनतेला संबोधित करताना सांगितले कि , ०३ मे पर्यंत देशात लॉकडाउन वाढवन्यात आले आहे . २० एप्रिल पर्यंत प्रत्येक राज्यातील स्थितीचे मुल्यांकन करण्यात येणार ज्या राज्यात करोना नियंत्रणात आणले जाईल , तेथील नियम शिथील केले जाणार जर कोरोनाचा पाय या जमिनीवर पडला तर शिथिलता तात्काळ मागे घेतली जाईल असे मोदी यांनी सांगितले . करोनाशी लढाई करण्यासाठी ७ प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून , याचे योग्य प्रकारे करून हि लढाई जिंकण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे . मोदींनी देशातील नागरिकांना खालील सात गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले असून , ते पुढीलप्रमाणे . . . १ ) घरातील वृद्धांची जास्त काळजी घ्या . . . ज्यांना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या २ ) लॉकडाउन आणि सोशल डिस्टिसिंगचं पूर्णपणे पालण करा . ३ ) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष्य मंत्रालयाच्या सुचेनचं पालन करा .करोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करा . ५ ) जवळ असलेल्या गरिब परिवाराची आवशकता पुर्ण करा ६ ) व्यवसाय , उद्योजकांनी कामगारांबाबत संवेदना बाळगा , कोणालाही कामावरून काढू नका ७ ) देशातील करोना योद्धांचा ( डॉक्टर , नर्स , पोलिस , सफाई कमगार आणि इतर कर्मचारी ) सन्मान करा असे सुचविले आहे . तसेच आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार , देशातील करोना बाधितांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे . यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे . यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत . करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत . करोनाची ५५० प्रकरणे होती , तेव्हाच भारताने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला . समस्या वाढण्याचा विचार केला नाही . समस्या दिसताच वेगाने निर्णय घेऊन रोखण्याचा प्रयत्न केला . हे असे सकंट आहे ज्याची कुठल्या देशाबरोबर तुलना करणे योग्य नाही . जगातील सामर्थ्यशाली देशांमध्ये करोनाचे आकडे पाहिले तर त्या तुलनेत भारतात चांगली स्थिती आहे .
14 April 2020
Home »
» देशात ०३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवले - नरेंद्र मोदी







0 comments:
Post a Comment