जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्हयात ६६८८१ जणांचा प्रवेश

 नांदेड: जिल्हयातील ग्रामीण , शहरी व मनपा क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या दैनंदिन सर्वेक्षणामध्ये ६६८८१ जण हे विदेशासह बाधित जिल्हे व इतर जिल्हयातुन आल्याचे सर्वेक्षणा अंती निदर्शनास आले आहे , या सर्व जणांना २८ दिवसांकरिता होम कॉरंटाईन करण्यात येवुन हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत . जिल्हयातील आरोग्य विभागाचे कर्मचारी , आशा कार्यकर्ती , अंगणवाडी कार्यकर्ती यांचे पथकामार्फत संपूर्ण जिल्हयात केलेल्या सर्वेक्षणात विविध ठिकाणाहुन जिल्हयात आलेल्या व्यक्तींची तालुका निहाय संख्या खालील प्रमाणे आहे . mar १ ) अर्धापुर : २२०३ २ ) भोकर : २०३४ ३ ) विलोली : ४१९१ ४ ) देगलुर : ६६३२ ५ ) धर्मावाद : १३९९ ६ ) हदगाव : ४५३९ ७ ) हिमायतनगर : १७४५ ८ ) कंधार : ९०२५ ९ ) किनवट : २४३५ १० ) लोहा : ४७६८ ११ ) माहुर : ३१६३ १२ ) मुदखेड : १५७१ १३ ) मुखेड : ९२७२ १४ ) नायगाव : ५८६९ १५ ) नांदेड : २२३८ १६ ) उमरी : १७९२ १७ ) म . न . पा क्षेत्र : ४००५ या सर्व ६६८८१ जणांना होम कॉरंटाईन करून , गावकरी , पोलिस , पदाधिकारी , प्रशासकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे त्यांचेवर निगराणी ठेवत आहेत . बाहेरुन आलेल्या व्यक्तीपैकी विदेशातुन जिल्हयात प्रवेश केलेल्या व्यक्तींची संख्या १८१ असुन , ( सौदी अरेबिया : ४९ , जर्मनी : ०३ , फांस : १ , जार्जिया : ०३ , ऑस्ट्रेलिया : ०८ , इजिप्त : ०२ , इंडोनेशिया : १३ , रशिया : ०६ , अमेरिका : ०५
व दिल्ली येथील निजामुदिन येथील मरकस मध्ये सहभागी : १६ व्यक्ती ) असुन , सर्व संशयितांचे स्वबचे सॅम्पल एनआयव्ही पुणे येथे पाठविले असता ते निगेटिव्ह आढळुन आले आहेत . जिल्हयातुन एकुण १४१ रुग्णांचा स्वब तपासणी एनआयव्ही पुणे येथे पाठविला असता १२६ सॅपल निगेटिव्ह , १० सँपल प्रलंबित , ०५ सॅपल रिजेक्ट आहेत . सध्या जिल्हयामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण पॉजिटिव्ह आढळुन आलेला नाही . जिल्हयात एकुण ५२३ कामगार शरणार्थी वास्तव्यास असुन , या सर्वांची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे , या सर्वांची आर बि एस के डॉक्टर्समार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येत असून , या ठिकाणी योग शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे . कोरोना संदर्भात जिल्हयामध्ये यापुढेही सातत्याने सर्वेक्षण करण्या बाबत सूचना देण्यात आल्या असुन , थोडीही लक्षणे दिसुन आली कि , तात्काळ आरोग्य पथकामार्फत तपासणी करण्यात येत असुन , थोडाही संशय आढळल्यास तात्काळ आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले जात आहे . जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये बाहय रुग्ण विभागात रुग्णांची तपासणी करण्यात येत असुन , संशयीत रुग्णांची स्वतंत्र नोंद करण्यात येत आहे . जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मार्फत सर्व वैद्यकिय अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी यांचे सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संपर्क ठेवुन , करावयाच्या कार्यवाहीबाबत वेळोवळी आदेश देण्यात येत आहेत . कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेवुन , मा . जिल्हाधिकारी महोदय यांचे दिशा निर्देशाखाली साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी करण्यास्तव जिल्हा प्रशासन , पोलिस प्रशासन , आरोग्य विभाग व विविध सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत . जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद , नांदेड

0 comments:

Post a Comment