नांदेड दि . 15 : - जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही . आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन 503 तर क्वारंटाईन कालावधी पूर्ण 140 जणाचे झाले आहे . निरीक्षणाखाली असलेले 43 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 39 ( yatrinivas ccc ) जण आहेत . घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 503 जण आहेत . आज तपासणीसाठी 42 जणांचे नमुने घेतली . एकुण 274 नमुने तपासणी पैकी निगेटीव्ह 226 तर नमुने तपासणी अहवाल बाकी 43 जणांचा असून नाकारण्यात आलेले नमुने 5 आहेत . जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकुण प्रवासी 73 हजार 679 असन त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत , अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड मार्फत देण्यात आली आहे .







0 comments:
Post a Comment