शहापूर- देशात कोरोना व्हायरस च्या पार्शवभुमीवर गेल्या अनेक दिवसा पासुन शासना तर्फे लाऊकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिसथितीत गोर गरीब लोकांंचे व मजुरांचे जिवन आर्थिक संकटात सापडले आहे.अश्या परिस्थितीत गरजू लोकांसाठी मुस्लिम युवा मंडळी व वसीम शहापुरकर मित्र मंडळ यांच्या पुढाकारातून १०० कुटुंबाना अन्न धान्य व अत्यावाश्यक साहित्य वाटप करण्यात आले.कोरोना विषानुच्या प्रसार रोखण्यासाठि गेल्या अनेक दिवसा पासुन लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपसमारीची वेळ आली आहे. संचार बंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दानशूर व्यक्ती कडून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या मदतीने गरजू नागरिकांना साहित्य पुरविले आहेत.वसीम शहापूरकर व त्यांच्या मित्र मंडळानी सुमारे १०० कुटुंबांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून आवश्यक सामान वाटप केले. यात तांदुळ,मसुरदाळ ,मिरची पॅकिट,तेल पॅकेट, हळद पॅकिट,मिठ पॅकिट,आदी वस्तूंचा समावेश आहे.हे सर्वाची किट तयार करून गरजुना वाटप करण्यात आले.यामध्ये सर्व मित्र मंडळीने परीश्रम घेतले.
प्रतिनिधी:गंगाधर भोयावार
प्रतिनिधी:गंगाधर भोयावार







0 comments:
Post a Comment