जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

15 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हुनगुंदा गावात जाणारा मुख्य रस्त्या बंद

बिलोली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. एवढंच नव्हे तर अधिकची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गंत विमान सेवा देखील बंद केली आहे. तसंच बस, रेल्वे यासारख्या दळणवळणाची साधने देखील सरकारने बंद करण्याचा मोठा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. दुसरीकडे तेलंगणा च्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कर्फ्यू लावून लोकांना घराच्या बाहेर येऊ नये असं आवाहन देखील सरकारने केलं आहे.सुरुवातीला शहरी भागात कोरोनाची भीती अधिक होती. आता याची झळ ग्रामीण भागातील लोकांना देखील बसू लागली आहे. त्यामुळेच बिलोली तालुक्यातील काही अंतरावरच असलेल्या हुनगुंदा या गावाच्या मुख्य रस्त्यावर सरपंच शिवलिंग पाटील,आकुलवार मोहन,पंडित पाटील,दिंगाबर आगळे,महेंद्र मराठे,अजिंक्य मस्के यांनी  काटेरी झाडे लावून रस्ता बंद केले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी तपासणी करून येण्यास सांगितले जात आहे.अगदी गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर  काटेरी झुडपे लावली गेली आहेत.त्यामुळे बाहेरून गावातील आलेल्या नागरिकांना सहजासहजी गावात प्रवेश मिळू शकत नाही.

0 comments:

Post a Comment