जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

14 April 2020

उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमितीची बैठक संपन्न . पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्या उपयुक्त सुचना

 नांदेड , दि . 14 : - राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला हरविणे , ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे , राज्याची आर्थिक , औद्योगिक , सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात जणांच्या मंत्री गटाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे . ही समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे . उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे बैठक मुंबई येथे आज घेण्यात आली . यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभाग घेऊन उपयुक्त सुचना दिल्या . यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले , कोव्हीड - 19 मुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन विविध विभागाच्यावतीने अनेक उपाययोजना करत आहे . राज्य शासनाकडून लोकप्रतिनिधी , कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्यात देण्यात येत आहे . परंतु उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कामागारांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे . कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी आहे तेथील अत्यावश्यक सेवेसह काही उद्योग सामाजिक अंतर ठेवून सुरु करणे गरजेचे आहे . कोरोना विषाणुचा प्रसार होणार नाही याबाबत जिल्हा सीमेवरील बंदी कायम ठेवणे अत्यावश्यक आहे . रुग्ण तपासणीसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व्हेंटिलेटर पीपीई कीट आदी उपकरणे उपलब्ध करुन देणे , कोरोना निर्बंधाचे पालन करुन रेस्टॉरंट , हॉटेलसारख्या सेवा सुरु करणे आवश्यक आहे , असेही त्यांनी सांगितले . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जलसंपदा मंत्री जयंत पाटील महसुलमंत्री बाळासाहेब थोरात , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा , पोलिस यंत्रणा स्थानिक स्वराज संस्था शासनाच्या विविध यंत्रणा युद्धस्तरावर काम करत आहेत . त्यांच्या लढाईला बळ देण्याचे कामही ही समिती करणार आहे . राज्यात 24 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे . त्यामुळे उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्र ठप्प झाले आहे . या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे . त्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरही ही मंत्रिमंडळ समिती निर्णय घेईल , अशी माहिती देण्यात आली . अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन ; 30 एप्रिलपर्यंत अहवाल कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सूचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे . ही समिती 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे . या समितीत जे . एस . सहानी ( सेवानिवृत्त आयएएस ) , सुबोधकुमार ( सेवानिवृत्त आयएएस ) , रमानाथ झा ( सेवानिवृत्त आयएएस ) , उमेशचंद्र सरंगी ( सेवानिवृत्त आयएएस ) , जयंत कावळे ( सेवानिवृत्त आयएएस ) , सुधीर श्रीवास्तव ( सेवानिवृत्त आयएएस ) , नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव , उद्योग विभागाचे प्रधान सचिव , वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश आहे . वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत . कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने ही समिती उपाययोजना सूचवेल , अशी माहिती देण्यात आली आहे.

0 comments:

Post a Comment