नांदेड दि . 15 : - अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्वये गुटखा पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही तसेच प्रतिबंधीत अन्न पदार्थासोबतच वाहनांची जप्ती करण्यात आली आहे . जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या चार प्रकरणात प्रतिबंधीतसाठा 7 लाख 70 हजार 740 रुपये व तीन वाहने किंमत 2 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकरी स . वि . कनकावाड यांनी 4 एप्रिल 2020 रोजी माहूर तालुक्यातील पोलिस स्टेशन सिंदखेड येथे जावुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ व दुचाकी वाहन एकुण किंमत 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी जावेद बरकत खिच्ची रा वाई बाजार यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा . द . वि . नुसार गुन्हा दाखल केला आहे . अन्न सुरक्षा अधिकारी सु . द . जिंतुरकर यांनी 8 एप्रिल रोजी धर्माबाद मे राजराजेश्वर किराणा दुकान बाळापुर रोड धर्माबाद यापेढीवर धाड टाकुन प्रतिबंधीत अन्न पदार्थ 4 लाख 59 हजार 190 रुपयाचा साठा जप्त करून या प्रकरणी रविकुमार शंकरराव कोडावार व राजकुमार शंकरराव कोंडावार याच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व _ _ _ भा . द . वि नुसार गुन्हा दाखल झाला आहे .देगलूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मरखेल येथे 11 एप्रिल रोजी मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा व वाहन किंमत 2 लाख रुपयेचा साठा जप्त करुन या प्रकरणी शेख जावेद शेख समदानी यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा . द . वि . नुसार गुन्हा दाखल झाला आहे . तसेच प्र म काळे यांनी अर्धापूर पोलिस स्टेशन अर्धापुर येथे जावुन 11 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ किंमत 9 हजार 750 रुपये व दुचाकी वाहन किंमत 35 हजार रुपये असा एकुण 44 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी शेख सोहेब शेख सलीम व फसिउददीन काजी यांच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा . द . वि . नुसार गुन्हा दाखल केला आहे . ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त ( अन्न ) , म . रा . अन्न व औषध प्रशासन तु . चं . बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे . प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणूक , वाहतूक , विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या , चोरटया पध्दतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री , उत्पादन , साठा , वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही समोरे जावे लागेल , असे आवाहन नांदेडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त ( अन्न ) तु . चं . बोराळकर यांनी केले आहे .
15 April 2020
Home »
» गुटखा पानमसाला विक्री कार्यवाहित चार प्रकरणात 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त







0 comments:
Post a Comment