जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

20 April 2020

भोकरचे ' ते ' १८ जण निगेटिव्ह !

 भोकर ( वार्ताहर ) , दि . २० : तेलंगणातील कोरोनाबाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या भोकर येथील १८ जणांच्या घशाचा द्रव तपासणीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे . तालुका आरोग्य अधिकारी डॉ . राहुल वाघमारे यांनी या माहितीला दुजोरा दिला . यासोबतच शुक्रवारी नांदेडहून पाठवलेल्या एकूण ४८ जणांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याची माहिती मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली . त्यामुळे आतापर्यंत निगेटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या ३६८ वर गेली असून एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आलेला नाही . भोकर - म्हैसा रस्त्यावरील राहटी तपासणी नाक्यावर १६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील आंब्याच्या ट्रकसोबत कोरोनाबाधीत चालक आला होता . तपासणीदरम्यान पोलीस प्रशासनाचे आणि परिवहन विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी त्या कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्याने शनिवारी १८ जणांची नांदेड येथे तपासणी करून त्यांचा स्वब औरंगाबाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आला . रविवारी रात्री उशिरा त्या १८ जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली . दुसरा अहवाल आल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे . कोरोनाबाधीत ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्यांचा काय रिपोर्ट येईल याबाबत भोकर तालुक्यातील नागरीकांत । चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने चिंताग्रस्तांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .

0 comments:

Post a Comment