जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

28 April 2020

लॉकडाऊनमुळे लग्नसोहळे लांबणीवर बॅन्डंवाल्याना मोठा फटका

देगलुर : लॉकडाऊनमुळे लग्नसोहळे लांबणीवर पडल्याने बॅन्डंवाल्याना मोठा फटका बसला आहे .  कोरोना ने बॅन्डं वाजविणार्याचाच बॅन्डं वाजविल्याचे म्हणत कर्ज काढुन मजुरांना दिलेले अॅडव्हान्स व बॅन्डं उभारणीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न बॅन्डं मालकांकडून विचारला जात आहे . जगात कोरोना ने थैमान घातले आहे . त्यामुळे उद्योगची दररोज फीरणारे चाके बंद पडली आहेत . तर व्यवसायाचे ही शटर बंद झाले आहेत . त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या रोजगारावर उपासमारिची वेळ आली आहे . तीच गत सध्या बॅन्डंचालकांची आणि त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांची झाली आहे . बॅन्डंवाले झाले हतबल कोरोना मुळे गर्दि टाळण्यासाठी 22 मार्चपासून लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतले होते . त्यामुळे बॅन्डंवाल्याना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे . बॅन्डंचे खर्या अर्थाने एप्रिल व मे महिना हे सिझन असते . या कालावधीतच जास्त लग्न होत असतात . मात्र या सिझन च्या वेळेतच लॉकडाऊन आल्याने ते हतबल झाले आहे . पुढे ही लॉकडाऊन उठवण्याचे अजुन संकेत दिसत नाही . तर लॉकडाऊन उठला तरी लग्नसोहळ्याना परवानगी मिळण्याची शक्यता नाही . त्यामुळे बॅन्डंवाल्याचा व्यवसाय चौपट झाल्याचे चित्र आहे. त्यांना राज्यभरातुन मागणी आहे . बॅन्डं कलाकार संघटनेच्या नुसार देगलुर मध्ये लहान मोठे मोठ्या प्रमाणात बॅन्ड कार्यरत आहेत . लग्नात बॅन्डंवाल्याची तीस हजारापासून ते दिड लाखापर्यंत सुपारी असते . एका बॅन्डंपार्टीत साधारपणे 15 ते 35 कलाकार काम काम करतात . बॅन्डंचालक आर्थिक विवंचनेत लग्नाच्या घेतलेल्या तारखा रद्द झाल्याने बॅन्डंचालकांचे मोठे नुकसान झाले आहे . सिझन सुरू होण्याअगोदर वाद्य वाजविणार्या काही महत्वाच्या कलाकारांशी करार करून त्यांना अडव्हान्सं दिला जातो . तर बाजारात संगीताचे नवनविन तंत्रज्ञान पुढे येत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी ते खरेदि करावे लागते . अनेकांनी कर्ज काढुन बॅन्डं उभा केला आहे . त्यामुळे बॅन्डंचे कर्ज कसे फेडायचे ? असा प्रश्न बॅन्डंचालकांसमोर उभा राहीला आहे . त्यासाठी शासनाने  विचार करून पुन्हा उभे राहण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी बॅन्डंचालकाकडुन केली जात आहे . मंगलकार्यालय ही पडले ओस एप्रिल - मे महिन्यात मंगलकार्य फुल्ल असतात . मात्र यंदा लॉकडाऊनमुळे लग्नसराईने कायम फुल्ल असणारे मंगलकार्यालय ओस पडली असल्याचे चित्र आहे . कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दि करता येणार नाही . त्यामुळे गर्दीच्या लग्नसोहळ्यावर बंदि घालण्यात आली आहे . यामुळे एप्रिल - मे महिन्यात लग्नासाठी करण्यात आलेले बँकिंग रद्द करण्यात आले आहेत . त्यामुळे राज्यातील हजारो मंगलकार्यचालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे . त्यानुशंगाने केटअर्स आदिंच्याही रोजगाराव कुर्हाड पडली आहे . कर्ज काढून बॅन्डं उभा केला आहे . वर्षाच्या सुरवातीला काही कलाकरांशी करार करून अडव्हान्सं रक्कम ही दिली आहे . मात्र लॉकडाऊन मुळे एप्रिल व मे मधे घेतलेल्या आर्डर रद्द झाल्या आहेत . त्यामुळे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न माझ्यासमोर आहे . यासाठी शासनाने बॅन्डंवाल्याना मदत देणे आवश्यक आहे .

माझ्या एप्रिल व मे मधील लग्नाच्या तारखा बुक होत्या . मात्र लॉकडाऊन मुळे त्या रद्द करण्यात आल्या . त्यामुळे पुढच्या वर्षी बॅन्डं कसा चालवायचा असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहीला आहे . शासनाने आम्हाला मदत करावी व शासनाने आमच्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करावा . -  - आणतेश्वर घाटे राम कृष्ण हरी बॅन्डंमालक देगलुर

2 comments:

  1. खरंच आहे बॅंडवाल्यावर संपूर्ण जबाबदारी असते त्या बँड पथकाची जर बँड पथकच बंद पडले तर त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो कारण सिजन येण्यापूर्वीच मजुरांना,बँड पथकातील विशेष कलाकारांना करार करून ऍडव्हान्स दिला जातो. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा खुपच वाढली आहे, त्यामुळे इलेक्टिकल वस्तू मध्ये मोठ्या प्रमाणात भर पडला आहे. या वस्तूची मागणी जनतेकडून मोठया प्रमाणात वाढते तेंव्हा त्या वस्तूचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतात, आशा परिस्थितीत बॅण्डमालाक कर्ज काढून किंवा काहीतरी वस्तू गहाण ठेवून त्या वस्तू उपयोगात आणतो आणि या लॉकडाऊनमुळे बँडवाल्यांच्या तोंडातून घास काढून घेतल्यासारखे दिसून येते........
    तरी शासनाने बँडपथकामधील कलाकारांचा विचार करून योग्य ते निर्णय घ्यावे......

    ReplyDelete
  2. बँड पथकातील कलाकारांच्या जीवनाची वेथा व त्यांच्या जिवंत उदाहरनासह आपण जो लेख लिहिला आहे तो खरच उत्तम आहे. कलाकाराला या महामारीला सामोरं जाताना त्यांच्या व्यवसायावर खूप मोठा नुकसान झालं आहे. .

    ReplyDelete