नांदेड , दि . 24 - शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शुद्धीपत्रक 24 एप्रिल मध्ये अंशत : बदल करुन केवळ अशा शेतीविषयक आस्थापना दुकाने कृषि उत्पन्न बाजर समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा व वाहतूक ज्यांना यापुर्वीच्या आदेशान्वये चालू ठेवण्यास मुभा दिली आहे . त्यांना आता सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा वेळोवेळी निर्गमीत आदेशात नमद अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी दिली आहे . या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि . 13 . 15 . 19 . 21 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे शेती विषयक आस्थापना , दुकाने वगळून इतरांसाठी दिलेले वेळेचे बंधन इत्यादी यापुर्वी प्रमाणेच अंमलात राहील , असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी 23 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे .
24 April 2020
Home »
» शेतीविषयक आस्थापना चालू ठेवण्यास सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत वेळेची मुभा







0 comments:
Post a Comment