बिलोली:कोरोणा विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे बिलोली तालुक्यातील टरबूज ( कलिंगड ) उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे काढणीसाठी तयार असलेले टरबुज विक्री अभावी शेतातच सडत आहेत . अंतर राज्यातील सीमा बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग टरबुजाची खरेदी करण्याची हिंमत करीत नाहीत . यामुळे लाखो रुपये खर्चुन काढणीस तयार केलेले पीक हातचे गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे . दरम्यान टरबूज पिकांच्या शेताची पंचनामे कृषी विभागाने करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे . तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात टरबूज ( कलिंगड ) या पिकाची लागवड केली आहे . ठिबक सिंचन , मील्लीचिंग पेपर असा सुमारे हजारो रुपये खर्च करून टरबुजाचे पीक काढणीसाठी तयार केले आहे . परंतु कोरोणा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव फळ बाजारात सुद्धा जाणवत आहे . बाजारातील मंदीमुळे एक एकर शेतातील टरबूज विक्री अभावी जागीच सडत आहेत . विभागातीलअनेक गावांच्या सीमा गावकऱ्यांनी कोरोणा रोगाच्या धास्तीने बंद केल्या आहेत . यामुळे टरबुजाची किरकोळ विक्री करण्यास आसपासच्या गावात विरोध होत आहे . कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्राबाहेर जाणारे रस्ते राज्यसरकारने बंद केले आहेत . यामुळे व्यापाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर फळ व भाजीपाला निर्यातीस मनाईआहे . परिणामी व्यापारीवर्ग सुद्धा शेतकऱ्यांकडून मोजकीच फळ व भाज्यांची खरेदी करीत आहेत .
01 April 2020
Home »
» बिलोली तालुक्यातील टरबूज उत्पादक अडचणीत ; विक्री अभावी शेतात सडत आहेत टरबूज







0 comments:
Post a Comment