बिलोली- देशात कोरोना व्हायरस च्या पार्शवभुमीवर गेल्या अनेक दिवसा पासुन शासना तर्फे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिसथितीत गोर गरीब लोकांंचे व मजुरांचे जिवन आर्थिक संकटात सापडले आहे.अशा परिस्थितीत श्री लक्ष्मण ठक्करवाड (जि.प.सदस्य आरळी यांच्या कडून गावातील गरजूंना अन्न धान्याची १० किट वाटप करण्यात आले.कोरोना विषानुच्या प्रसार रोखण्यासाठि गेल्या अनेक दिवसा पासुन लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपसमारीची वेळ आली आहे.हेच लक्षात घेऊन गावातील 10 कुटुंबाना किट वाटप करण्यात आले.यावेळी गावातील क्रष्ण मंदिरचे पुजारी किशन महाजन, राजेंद्र कापावार,(से.सो.चेअरमन), सुधाकर कापावार(अध्यक्ष तंटामुक्ती) किशन मलेकरी,श्रीहरी कापावार, राजेंद्र गोनेवाड,दिगंाबर अनमुलवाड, पेंटाजी आनमुलवाड,उत्तम यारावाड यांची उपस्थित होती







Good
ReplyDelete