मुंबई : कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असून , १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणा नाही . १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या पट्टयात येतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्टयात समाविष्ट होतील , या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खवरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरु करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हीडिओ संवाद साधला . याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले . येत्या एक दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगून टोपे म्हणाले , केंद्र सरकारने १५ आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे , १५ पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला अरिंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे . ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात . म्हणजे या दोन झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली . केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो .
12 April 2020
Home »
» हिरव्या आणि पिवळ्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल होणार. :राजेश टोपे यांची माहिती







0 comments:
Post a Comment