नांदेड , दि . 13 : - जिल्हालदंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया दंडसंहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 3 ) अन्वये जिल्हायात मनाई आदेश 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपासुन ते 30 एप्रिल 2020 रोजी मध्यिरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यात संपुर्ण नागरी , ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात या कार्यालयाने यापुर्वी काढलेले प्रतिबंधात्मयक आदेश व अत्यावश्यलक सेवा , शेती विषयक तसेच वेळोवेळी दिलेल्याा इतर बाबींसाठीची सुट जशास तशी अंमलात राहील , असे आदेश निर्गमीत केले आहे . या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातुन करावी . त्यालचप्रमाणे या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यशक्ती , संस्थाद अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थाणपन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्याकत येईल व कारवाई करण्याणत येईल . या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सदहेतुने केलेल्या कृत्यांईसाठी कुठल्याकही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्दत कुठल्यातही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही . हे आदेश 13 एप्रिल रोजी जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित करण्याथत आला आहे .शासनाने कोविड - 19 चा प्रादुर्भाव रोखण्याीच्याज अनुषंगाने उपायोजनेचा एक भाग म्हकणुन मुख्या सचिव महाराष्ट्रव शासन यांचेकडील 13 एप्रिल 2020 अन्वये यापुर्वी दिलेले सर्व प्रकारचे आदेश , परिपत्रक , निर्देश 30 एप्रिल 2020 पर्यंत लागु राहतील असे अधिसूचित केले आहे , असेही आदेशात नमूद केले आहे .
13 April 2020
Home »
» जिल्हयात फौजदारी प्रक्रिया दंडसंहीतेचे कलम 144 ची मुदत 30 एप्रिलपर्यंत







0 comments:
Post a Comment