तालुका प्रतिनिधी -
भोकर -शहराच्या बाजूला असलेला तेलंगाना सीमा अगदी काही किलोमीटर असताना तेथून काही सिंधी माफिया सिंधी आणून भोकर शहरांमध्ये अवैध रीतीने सिंधी विक्री करताना आढळून आले आहे, व तसेच काही जागी सिंधी च्या नावाखाली मिलावटी सिंधी स्वतः घरी बनवून त्यात केमिकल मिसळून विक्री करत आहे मागील काही महिन्याखाली बरेच तरुण सिंधीच्या चपेट मध्ये आले आहेत, ही सिंधी जीवाला धोकादायक अशी ठरली आहे. परंतु अशा सिंधी माफियांवर प्रशासन कठोर पाऊल कधी उचलणार हे कळालेला नाही. भोकर शहरात बरेच ठीक ठिकाणी अवैध रीतीने नशेली सिंधी विक्री जोराने चालू आहे. यांच्यावर कठोर कारवाई कधी होईल असे जनतेचा प्रश्न आहे. तरुण पिढी या सिंधीच्या आधीन झाले आहेत व त्यांना लत लागली आहे यावर त्यांचा घर सुद्धा उद्धवस्त होताना दिसून येत आहे.







0 comments:
Post a Comment