केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्यातर्फे घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत शहरातील गुणवत्तेत अग्रणी आसलेल्या सुमेध सर'स क्लासेसच्या
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे असून गुणवंत विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भोकर शहरात विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तेसाठी धडपडणारी एकमेव खाजगी शिकवणी संस्था म्हणून सुमेध सर'स क्लासेसचे नाव लौकीक आहे. सुमेध सर'स क्लासेसचे संचालक सुमेध हनवते, प्राध्यापिका प्रणिता जाधव, यांच्या समर्पित प्रयत्नामुळे दहावी, बारावी, तासेच शिष्यवृत्ती नवोदय परिक्षेत घवघवीत यश मिळवत आहेत. या क्लासमध्ये विद्यार्थ्याना वैयक्तिक लक्ष दिल्या जाते आणि वेळोवेळी तज्ञांकडून विषयानुरूप मार्गदर्शन केले जाते हे जमेची बाजू आहे.याचाच परीणाम नुकतेच घोषित करण्यात आलेल्या सन २०२४ च्या दहावी (सीबीएसई) परिक्षेत
रेहान अल्लाउद्दीन शेख 89.6% मुदखेडच्या केंद्रीय शाळेत पहिल्या क्रमांकावर आला आहे तर अभिषेक जळबा सरोदे या विद्यार्थ्याने 76% गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे .
.केंद्रीय पद्धतीत शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणून सुमेध सरस क्लासेसचे नाव समोर येत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, या क्लासेसचे कर्मचारी सुमित गणेशराव हनमंते, प्रशांत गणेशराव हनमंते,श्रद्धा सतीश जाधव आदीसह सामाजिक व राजकिय क्षेत्रातील आनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.







0 comments:
Post a Comment