जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 March 2024

गाडगे महाराज आश्रम शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा…

भोकर तालुका प्रतिनिधी:
तालुका विधी सेवा समिती व गाडगे महाराज आश्रम शाळा सीताखांडी भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ रोजी येथील आश्रम शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मराठी रसिकांच्या मनावर सुमारे चार दशकांपेक्षाही अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त तालुका विधी सेवा समिती व गाडगे महाराज आश्रम शाळा सीता खांडी भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय दिवाणी न्यायाधीश आर एस इरले सर, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक जी के वानखेडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यू पी चव्हाण, ऍड.आर के कदम ऍड.एम पी पेदे आदीं मान्यवरांसह दिलीप मच्छेवार, व्यंकटेश दुधाटे उपस्थित होते.

ऍड. पेदे यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगून तिचे महत्त्व विशद केले. ऍड. कदम यांनी मराठी भाषा संवर्धनाची गरज अधोरेखित केली.तसेच मराठी भाषेच्या गौरव आणि संवर्धनासाठी दर्जेदार साहित्य निर्माण करणे,मराठी साहित्य वाचणे, भाषेतील सुधारणासाठी उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायाधीश आर एस इरले साहेब यांनी अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्रातील संतांनी केलेल्या महान ग्रंथरचनेतून मराठी भाषेचा गौरव झाला असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.

प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. येथील विद्यार्थिनींनी सुरेल आवजात सादर केलेल्या स्वागत गीतानंतर मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी सदरील शाखेच्या संचालिका ज्योतीताई रामेश्वर ढाणकीकर, सहशिक्षक बालाजी यमलवाड,विनोद लेंडे,आनंद चिंचोले,आनंद कुलकर्णी, बसवेश्वर भद्रे,अधीक्षक सोनबा भंडारवाड, शुभांगी सूर्यवंशी, संगीता शिलगिरे,ज्योत्स्ना जांभुळकर,अंजनाबाई मोरे, कल्पना मस्के यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सिरसे यांनी तर आभार कमलाकर उजेडे

0 comments:

Post a Comment