परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत असलेले संतोष श्रीहरी कापावार (उपकार्यकारी अभियंता) यांचे चिरंजीव ओमसाई संतोष कापावार इयत्ता ८ वी भेल सेकंडरी स्कूल टि पी एस कॉलनी परळी याची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२४ मध्ये नोंद झाली आहे.त्याने मिळविलेल्या या यशाबद्दलत्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ओम साई चे रुबिक क्यूब मधील योगदान पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या टीमने ओम साई चे विशेष कौतुक केले व २०२४ चा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे पुस्तक, गोल्ड मेडल, खऊ उरीव, एक पेन व दोन स्टिकर, एक बॅज देऊन ओमसाईचा सन्मान करण्यात आला. ओमसाई हा भेल सेकंडरी शाळेचा विद्यार्थी असून तो ईयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.विद्युतकेंद्राच्या वर्धापनदिना निमित्त Tal-ent Show चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ओमसाईनेपायाने 3X3X3 रूबिक क्युब डेींश केल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी त्याची तोंड भरून स्तुती केली होती. आतापर्यंत ओमसाईने वेगवेगळ्या ठिकाणी रूबिक क्युबच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. थर्मल कॉलनी परळी वैजनाथ येथे आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रूबिक क्युबचा प्रशिक्षक म्हणून त्यांने विद्यार्थ्यांना रूबिक क्युब विषयी मार्गदर्शन केले आहे. त्यावेळचे औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, तसेच मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी ओमसाई चे खूप कौतुक केले आहे. ओमसाईचे जडघ डारींीं र्डीलश या नावाने Youtube Channel ही आहे. उहरपपशश्र च्या माध्यमातून तो वेगवेगळ्या रूबिक क्युब विषयी माहिती देत असतो. एव्हढेच नाही तर १५० रूबिक क्युब चा वापर करून त्याने अहिल्यादेवी होळकर, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर महाराज, श्री प्रभू रामचंद्र, ईत्यादी महापुरुषांच्या हुबेहूब प्रतिमा साकारल्या आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२४ मध्ये नोंद झाल्याबद्दल त्याचे परळी परीसरात कौतुक होत आहे.







0 comments:
Post a Comment