जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

14 April 2024

महाविकास आघाडीच्या वतीने महामानवास अभिवादन

भोकर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
     भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील, माजी जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, शहरअध्यक्ष तोहसिफ इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार, श्रीधरराव पाटील नायगावकर, हनुमंत पाटील जाधव, कमल नर्तावार, बंडू पाटील गाडेगावकर, राष्ट्रवादी काँ. (शरद पवार गट ) ता. अध्यक्ष एडवोकेट शिवाजी कदम, शिवसेना (उबाठा )चे सुभाष नाईक, रमेश पाटील महागावकर, प्रदीप दौलतदार आदी मान्यवरांसाह तिन्ही पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.
  मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिवादनानंतर कार्यकर्त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ' अशा जोरदार घोषणा दिल्या.

0 comments:

Post a Comment