भोकर/नांदेड लोकसभेची निवडणूक सध्या जोमात असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. त्यात सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रचायंत्रणा राबवित आहेत कोण नात्यात गोत आणत आहेत कोण तर कोण त्यांच्या नातलगांना आणून येथील पुढाऱ्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीला भोकर मतदार संघातील बंजारा समाजाच्या वतीने एक मेळावा घेऊन पाठींबा देणार असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. अविनाश भोसीकर यांनी आपल्या भाषणात म्हटल की नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस म्हणजे भाजपची बी टीम होय आणि निवडणूक संपताच ते सर्व एकत्र येतात.
नांदेड लोकसभा मतदार संघात बंजारा समाज चांगला असून निर्णायक भूमिका बजावू शकतो त्यांनी ठरवलं तर कोणाला निवडून आणायचं व कोणाला पडायचं हे गणित त्यांच्या मतांवर बरचस अवलंबून असते म्हणून आजपर्यंत उपेक्षित, वंचित राहिलेल्या बंजारा समाजातील लोकांनी एकत्र येऊन बंजारा समाजातील अनेक प्रश्न, लोकसभेत मांडण्यासाठी धनदांडग्या, घराणेशाहीचा विरोध करून सर्वसामान्य, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपडणारा, एक उच्चशिक्षित, अभ्यासू, होतकरू असा उमेदवार म्हणजे ॲड. अविनाश भोसीकर यांना पाठींबा देणार असल्याचं आश्वासन गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी सर्वांच्या साक्षीने भोकर येथील मोंढा मैदानावर झालेल्या मेळाव्यात दिलं.यावेळी डॉक्टर बी डी चव्हाण वंचित बहुजन आघाडी उमेदवार हिंगोली यांना हिंगोलीत लिंगायत समाज मतदानाच्यास्वरूपात मदत करेल तर तुम्ही बंजारा येथे मला मतदानरुपी आशीर्वाद द्या तुमचा शब्द पडू देणार नसल्याचे भोसीकर म्हणाले.
भोसीकर बोलताना पुढे म्हणाले की ही निवडणूक जिंकणे हे आपल्यासाठी फार अवघड नसून बहुजन समाज, ओबीसी, मुस्लिम, लिंगायत यांनी जर मला मतदान केलं तर लोकसभा माझ्यासाठी दूर नाही लोकांचा रोष विरोधी दोन्ही पक्षावर आहे. त्यामुळे आपलाच विजय मिळवला निश्चित असून सर्वांनी एकजुटीने इमानइतबारे पक्षाच काम करा होणारा खासदार मी नसून तुम्ही आहात असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर येथील प्रचारात अनेक युक्त्या, प्रयोग करण्यात येत आहेत कोणी नात्याला गोत्यात आनन्यासाठी दाजीला मेव्हण्याच्या गृहमैदावर प्रचारासाठी आणून येथील पुढाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. मोदी गॅरंटी कार्ड वापरत आहे.
तर आम्ही निवडून आल्यावर गोरगरिांसाठी विविध योजना,अनुदान, देवू अशा प्रकारे सवलतीची खैरात घेवून कोण्ही मतदारांना फुस लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहेत.
या मेळाव्याला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे मुदखेड तालुका कांबळे,
भोकर तालुका अध्यक्ष दिलीप राव,
गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण,
जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण,
गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड,
गोरसेना जिल्हा संघटक धोंडू राठोड,
गोर सेना जिल्हा नायक प्रकाश राठोड,
गोरसेना तालुका अध्यक्ष भोकर मिलन जाधव,
गोरसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड,
गोर सेना प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार विशाल जाधव यांच्यासह मतदार संघातील अनेक तांड्यांचे नायक, कारभारी, डावो, यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थीती होती.







0 comments:
Post a Comment