भोकर- गोरसेना जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये भोकर येथे समस्त गोर बंजारा समाज महामेळावा मोंढा मार्केट भोकर येथे आयोजित करण्यात आले,
या कार्यक्रमात समस्त गोर बंजारा समाज तसेच भोकर तालुक्यातील संपूर्ण तांड्यातील नायक ,कारभारी, सरपंच ,डाव ,बंजारा समाज सांस्कृतिक वेशभूषा मध्ये महिला मंडळ ,या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते,
या कार्यक्रमात गोरसेनेचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती ,तसेच ओबीसी चे उमेदवार अविनाश भोसीकर, व त्यांच्याबरोबर डॉक्टर बि. डी .चव्हाण, उपस्थित होते, राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी या महामेळावा मध्ये भाषण करताना जाहीर स्वरूपात अविनाश भोसीकर यांना गोरसेनेच्या वतीने भरपूर पाठिंबा देणार अशी जाहीर केले,
हा कार्यक्रम गोर सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड, जिल्हा संघटक धोंडू राठोड , जिल्हा नायक प्रकाश राठोड ,तालुका अध्यक्ष मिलन जाधव, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, जिल्हा सचिव सखाराम राठोड तालुका सचिव प्रभाकर राठोड ,तालुका उपाध्यक्ष योगेश राठोड, शहराध्यक्ष विशाल राठोड, छायाचित्रकार प्रसिद्ध पृथ्वीराज आडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विशाल जाधव उपस्थित होते,







0 comments:
Post a Comment