जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

22 October 2023

हाळदा उपकेंद्रात आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न

 भोकर प्रतिनिधी:- तालुक्यातील मौजे हाळदा येथे आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढण्यासाठी दि.२१ ऑक्टोबर रोजी आरोग्य उपकेंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मोघाळी प्राथमिक  आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे  माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड, माजी उपसरपंच मधुकरराव किसवे,शंकरराव पेरेवार आदींची उपस्थिती होती. 
  आयुष्यमान कार्डधारकांना देशातील शासनाने निश्चित केलेल्या सर्व दवाखान्यात पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय सेवा व तसेच महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियाही मोफत करुन मिळतील   तेव्हा गावातील सर्व लाभधारकांनी या शिबिरात आपले आयुष्यमान कार्ड काढून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व आरोग्य सुविधाचा मोफत लाभ घ्यावा असे सांगून हे शिबिर पुढेही चालू राहील तेव्हा सर्व गावकर्‍यांनी आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे व आपल्या आरोग्याची देखभाल करावी असे डॉ.नाईक यांनी सांगितले.या वेळी  गावातील ७० ते ७५  लाभधारकांनी आपले कार्ड काढून घेतले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हाळदा आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर गर्जे मॅडम,सुपरवायझर श्री माचेवाड,ए एन एम श्रीमती पोकलेवाड,श्रीमती रापतवार, श्रीमती वाघमारे व कर्मचारी यांनी मोलाचे  परिश्रम घेतले.

0 comments:

Post a Comment