जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

27 October 2023

आरक्षण मागणीसाठी भोकर तालुक्यातील बटाळा, मातुळ,बोरगाव गावात साखळी उपोषण सुरु राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेशबंदी

भोकर प्रतिनिधी: सकल मराठा समाजस ओ.बी.सी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे या मागणीसाठी समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनास जी मुद्दत दिली होती ती संपली असून अद्यापही ही मागणी मंजूर न झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनास संबंध महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावोगावी साखळी उपोषणाने त्यांना पाठींबा दिला जात आहे.तसेच सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही कडील राजकीय पुढाऱ्यांना सदरील मागणी मंजूर होईपर्यंत गाव प्रवेशबंदी केल्या जात आहे.याच अनुषंगाने भोकर तालुक्यातील बटाळा,मातुळ येथे हे आंदोलन सुरु झाले असून दि.२८ ऑक्टोंबर रोजी बोरगाव सुधा येथे सदरील आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.याबाबद भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजास ओ.बी. सी.प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे यासह आदी मागण्यांसाठी उपषोण सुरु केले होते.सदरील उपोषणाच्या तात्पुरत्या सांगतेवेळी त्यांनी राज्य शासनाने निर्णय घ्यावा यासाठी ४० दिवसांची मुद्दत दिली होती.परंतू ती मुद्दत संपलेली असतांनाही कसलाही निर्णय शासनाने घेतला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरत असून संयमाचा बांध फुटत असल्याचे निदर्शनास येत आहे.राज्यातील गावोगावी सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात या यासाठी साखळी उपोषण केले जात आहेत व सर्व राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेशबंदी केली जात आहे.काल नांदेड जिल्ह्यातील एका गावात विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत.त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे असे दिसत असून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा असे म्हटल्या जात आहे.
याच अनुषंगाने भोकर तालुक्यातील बटाळा,मातुळ या गावातील सकल मराठा समाज बांधवांनी ही आंदोलन सुरु केले असून बोरगाव सुधा या गावात दि.२८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता पासून बेमुद्दत साखळी उपोळणास सुरुवात करण्यात येणार आहे.याबबद दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी बोरगाव सुधा येतील सकल मराठा समाज बांधवांनी तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना व त्यांच्या मार्फत राज्य शासनास निवेदन दिले आहे.तसेच त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली असून कुठलाही राजकीय पुढारी प्रवेश केल्यास त्याच्या जीवित्वाची व गाड्यांची जबाबदारी ही त्या राजकीय पुढाऱ्यावरच असेल.त्यामध्ये सकल मराठा समाज बोरगाव सुधा यांची कुठलीच जबाबदारी नसेल.याची दखल प्रशासनाने घ्यावी,असे नमुद करण्यात आले आहे.याच बरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या सरकारने पुर्ण कराव्यात.मराठा समाजाला ओ.बी. सी.मध्ये समाविष्ट करुन आरक्षण द्यावे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून घटनेमध्ये दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.मागील काळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी वस्तीगृह उभारण्यात येईल,असे राज्य सरकारने सांगीतले होते.परंतू त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे तात्काळ त्या मागणीची अंमलबजावणी करावी.उपरोक्त मागण्या जो पर्यंत मान्य होणार नाहीत तो पर्यंत आम्ही बेमुद्दत साखळी उपोषण सुरुच ठेऊ असा ईशारा ही देण्यात आला आहे.सदरील आंदोलनास गावातील एस.सी.,एस.टी,ओ.बी.सी. समाज बांधवांनी ही पाठींबा दर्शविला असून आंदोलना संबंधीत निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आनंदराव पाटील लुंगारे,शंकर पाटील जाधव,शिवानंद पाटील शिंदे,आनंद पाटील चिट्टे,प्रतापराव पाटील जाधव साईनाथ पाटील शिंदे,सुनिल पाटील पवार,माधव पाटील सुर्यवंशी,साहेबराव पाटील कदम, सरपंच प्रतिनिधी संतोष गाडले,माजी सरपंच गितेश बोटलेवाड, उमेश महाराज पुरी,रायभोळे यांसह आदींचा समावेश होता

0 comments:

Post a Comment