जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 October 2023

शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा उत्सहात संपन्न

 शेगाव 
हजारो भाविकांनी घेतल दर्शन
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा दिनांक 6 व 7 आक्टोबर 2023 रोजी संत नगरी शेगाव येथील गणेशप्रस्थ मंगल कार्यालय, एम. एस. ई. बी. चौक खामगाव रोड, येथे दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी जगद्गुरुश्रींचे दर्शन घेतले. भाविकांनी गुरुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी रेल्वे स्टेशन पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आढळून आल्या. गुरुमाऊलींचे दर्शन कधी होणार यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती पण प्रत्यक्ष दर्शन होताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना दिसून आला.गुरुसेवकांच्या अतिशय शिस्तबद्ध पध्यतीने,सूक्ष्म नियोजनाने सोहळा अतिशय सुंदर संपन्न झाला. येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही दिवसभर करण्यात आले होते. गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी अमरावती, यवतमाळ ,अकोला ,बुलढाणा,वासिम,नांदेड,हिंगोली,परभणी,नागपूर, या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक, भक्तगनाची रीघ लागली होते. माऊली या सोहळ्यात आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांच्याशी बोलताना म्हणाले की मी यांची समस्या सोडवत नाही तर आध्यात्म,व विज्ञान याची सांगड घालून डोळे विज्ञानवादी ठेवून मन एकाग्र करून दिवसातून फक्त दहाच मिनिटे भक्ती केली तर जीवन उत्तम जगता येते त्याचं बरोबर भक्ती हा मनाचा व्यायाम असून भक्ती केल्यामुळे निर्णय क्षमता योग्य बनून जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने जीवन सुजलाम,सुफलाम बनते व आनंदी संसार होतो त्याकरिता प्रत्येकानी आपल्या आवडीच्या देवाची भक्ती करावी.असा सल्ला देतो जो याप्रमाणे वागतो. तो जीवनात सफल होतात त्यांना माझा विश्वास येतो म्हणून लोक मला देव मानतात मी कधीच कोणाला गंडा,धागा,दोरा,मंत्र,तंत्र,जादू, टोना करीत नाही ना याचे समर्थनही करीत नसून मी पूर्णपणे अंधश्रध्ये च्या विरोधात असून लिंबू,टाचण्या, गंडे,दोऱ्या ह्या निव्वळ बनवा बनवी असते त्यामुळे माझ्या कडे अलात माझ्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने मी सांगतो त्या पद्धती ने दिवसातून फक्त दहा मिनिटे भक्ती करा,स्वप्नातही कोणाचे वाईट चिंतू नका,पाहा तुमचे कसे चांगले होत नाही.असे म्हणून सद्या ग्लोबल वॉर्मिग चा प्रश्न खुप भेडसावत असून येणाऱ्या पिढीला तो हानिकारक आहे व माझ्या लेकरांना म्हणजेच भक्तांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या वर्षी पासून म्हणाजेच माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने माऊली माहेर सिमुरगव्हाण पाथरी जिल्हा परभणी,नाशिक,आणि मुंबई या तुम्ही उपापिठा वरून पाई दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे कारण म्हणणे सकाळी लवकर उठून पाई चालल्याने सुध्द्ध ऑक्सिजन मिळत असते त्यामुळे ब्लड प्रेशर व्यवस्थित राहून,वजन कमी होवून शारीरिक कष्ट होवून तब्येत चांगली राहते,अध्यात्मिक प्रगती होवून पुण्य संचय होतो व माझी वांसुधरा या उपक्रमअंतर्गत दिंडी मार्गावरील सर्व परिसर स्वच्छ ठेवन्यासाठी सर्वजण एकमताने काम करतात त्याचरोबर वृक्ष लावून ते जागिण्यासाठी संदेश मिळतो त्यातून वातावरणातील उष्णता,जल,आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे.जर आज जल,जंगल,व आरोग्य टिकवून ठेवू शकलो नाही तर येण्याऱ्या पिढिला काय जवाब देणार असेही स्वामींनी आवर्जून म्हणाले महणून या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील दिंडी ही 21ऑक्टबर ला नानिज धाम येथे पोहचणार आहेत तरी यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असे ही सांगण्यात आले .
त्यावेळी अनेक भाविक यांनी आप आपले अनुभव कथन केले.
 दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी पश्चिम विदर्भ पिठाचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे,पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल ,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे ,पीठ महिला निरीक्षक सौ. लताताई चिंचोले, पीठ युवा निरीक्षक सतीश पाध्ये,पीठ लेफ्टनंट जनरल प्रफुल्ल धोटे, पीठ गुरु सेवक प्रमुख सौ. आरती वर्धेकर ,स्वागत कक्ष विभागातील सुधाकर मेहसर ,पिठ समितीचे अशोकराव धुमाळे, चंद्रशेखर टेंभेकर, अशोक गोंदाने, वैभव भिसे,जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे,अविनाश देशमुख, महेंद्र देशमुख ,विनायक सवई, गणेश देशमुख,जिल्हाध्यक्ष कैलास डोंगरकर यांच्यासह पीठ समितीचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष ,हिंदू संग्राम सेना ,युवा सेना ,महिला सेना आदीनी मेहनत घेतली.



Byt 1 जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
Byt 2 कॅन्सर मधून ठीक झालेला रुग्ण
Byt 3 सुनेला अपत्य नव्हते पण स्वामीजींच्या कृपेने मुलगा झाला अनुभव सांगणारी महिला.


0 comments:

Post a Comment