जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

03 October 2023

मराठा महिला आंदोलकांना अशोकराव चव्हाण यांची भेट

 नांदेड : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात सरकारने एक महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्यामुळे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले. पण साखळी उपोषण चालूच आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथे सकल मराठा महिलांच्या वतीने साखळी उपोषण चालू आहे. त्याचा आज चौथा दिवस होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.यावेळी आंदोलनकर्त्यांशी हितगुज करताना चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आम्ही आमच्या परीने काम करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हैद्राबाद येथील काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पन्नास टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी ठराव घेतला व ते केंद्र सरकारला पाठविला आहे, असे ते म्हणाले. याआधीच्या सरकारने वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाची प्रचंड निराशा केली आहे, तसेच आताही होऊ नये, म्हणून समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यांसह समाजबांधव सरकारच्या प्रत्येक बाबींकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

कृष्णा मंगनाळे, डॉ. स्मिता गायकवाड, सुरेखा रावणगावकर, रत्नमाला जाधव या महिला उपोषणकर्त्यांसह मीनाक्षी पाटील, सोमवारी संगीता सूर्यवंशी, शैलजा पाटील, संतोषी पवार, कविता आगलावे, प्रियंका कैवारे यांच्यासह चव्हाण यांच्यासोबत माजी आ. अमर राजुरकर, मीनल खतगावकर, माजी महापौर जयश्री पावडे, आनंद चव्हाण, डॉ. रेखा पाटील, किशोर स्वामी, संगीता डक, विठ्ठल पावडे यांची उपस्थिती होती.

0 comments:

Post a Comment