जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 October 2023

भोकर मध्ये भव्य मिरवणूकीने प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी

भोकर : भोकर मध्ये इस्लाम धर्म संस्थापक हजरत प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जयंती अर्थातच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली व  काढण्यात आलेल्या मिरवणूकीत (जुलूसमध्ये) मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या लहान थोर मुस्लीम बांधवांनी "नारा-ए-तकबीर,अल्लाहू अकबर,यांसह आपल्या प्रेषितांचा जयघोष" मोठ्या उत्साहात करत ही जयंती साजरी केली.

इस्लाम धर्म कालगणनेनुसार ‘रबीऊल अव्वल’ या महिन्याच्या १२ तारखेला प्रतिवर्षी इस्लाम धर्म संस्थापक प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जयंती साजरी केली जाते. परतू यावर्षी अनंत चतुर्दशी श्री गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी हे एकाच दिवशी आल्याने आपापल्या श्रद्धास्थानांच्या मिरवणूका काढतांना धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखला जावा,कायदा,शांतता व सुव्यवस्थेचे पालन व्हावे आणि शासन,पोलीस प्रशासनावर ताण पडू नये म्हणून संबंध राज्यात अनंत चतुर्दशीला दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त होणारे कार्यक्रम,उपक्रम,मिरवणूका काढण्यात येऊ नयेत असे आवाहन करण्यात आले होते. तसेच दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य सरकारने सुट्टी ही जाहीर केली होती.सरकार,पोलीस प्रशासनाच्या उपरोक्त आवाहनास राज्यातील मुस्लीम बांधवांनी प्रतिसाद दिला व दि.२८ सप्टेंबर रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.याच अनुषंगाने ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव समिती भोकर ने दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जयंती साजरी करण्याचा व जयंती निमित्तची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी सईद नगर, भोकर येथील 'मस्जिदे आयेशा' येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.इस्लामी ध्वज,फुलांचे हार,फुगे लावून चारचाकी रथ वाहन सजविण्यात आले होते व त्यात  ‘मदिना शरीफ’ ची प्रतिकृती उभारण्यात आली आणि 'जुलूस-ए-मुहम्मदी’ भव्य मिरवणूक मुख्य रस्त्याने काढण्यात आली.पारंपरिक पद्धतीने 'फातिहा पठण' करत,"नारा-ए-तकबीर,अल्लाहू अकबर,यांसह आपल्या प्रेषितांचा जयघोष" मोठ्या उत्साहात करत निघालेल्या या मिरवणुकीत हाजी ईद्रीस सेठ,हाजी इमरान सेठ, सामाजिक कार्यकर्ते शेख युसुफ भाई,माजी नगरसेवक शेख जवाजोद्दीन बरबडेकर,माजी नगरसेवक शेख मकसूद गोंदवाले,काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शेख रियाजोद्दीन बरबडेकर,सामाजिक कार्यकर्ते बाबाखाॅन पठान,एस.टी.कर्मचारी संघटना नेते म.ताजोद्दीन,बांधकाम गुत्तेदार शेख आमिर भाई,एम. आय.एम.नेते जुनेद पटेल,भाजपाचे शेख अर्शद अहेमद, शेख सऊद गोंदवाले,शेख अयूब भाई,करीम करखेलीकर,व्यापारी आतीफ भाई दातारवाले,रफिक भाई मेडीकलवाले,शेख अश्शू,बांधकाम कंत्राटदार शेख सलमान,एकबाल भाई मेकॅनिक,यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व लहान थोर मुस्लीम बांधव मोठ्या सहभागी झाले होते.

सदरील मिरवणूकी दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे जमियत-ए-उलैमा-ए-हिंद चे जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते मौलाना मुबीन खाॅन इनामदार यांनी ईद-ए-मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी आणि सहभागी मान्यवरांचा शॉल व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान केला.तर ईद-ए-मिलादुन्नबी समितीच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,भोकर येथे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,सहा.पो.नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि.राम कराड, यांच्यासह पोलीस अधिकारी,कर्मचारी,गृह रक्षक दलाचे जवान (होमगार्ड),राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,भोकर तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,जेष्ठ पत्रकार शेख लतिफ भाई,पत्रकार एजास कुरेशी,यांसह आदी पत्रकार बांधवांचा शॉल व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

अतिशय शांततेत व उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीचा ईदगाह मैदान,भोकर येथे सामुदायिक प्रार्थनेने समारोप करण्यात व अन्नदान करण्यात आले. भोकर शहरात प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम,उपक्रम व मिरवणूक आनंदोत्सवात यशस्वी झाली.हे सर्व यशस्वी करण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबी समिती भोकर चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हमीद खान पठाण,उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मन्सूर खान पठाण,शेख नाजीम भाई,पत्रकार शमीमोद्दीन इनामदार, बाबूभाई तामसेकर,यूसूफ सेठ दातारवाले,एजाज भाई लाईनमेन,आवेस तामसेकर,सलमान तामसेकर,आसिफ तामसेकर यांसह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व मुस्लीम बांधवांनी परिश्रम घेतले.तर यादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

0 comments:

Post a Comment