प्रतिनिधी भोकर : तालुक्यातील भूमिपुत्र संतोष मेंदेवाड,रा. देवठाणा व दत्ता मानेबोईनवाड रा.नांदा म्है.प.यांची भारत मातेच्या सेवार्थ भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे.या दोघांना देशसेवेची सर्वात मोठी संधी मिळाली असून दोघेही लवकरच आपल्या कर्तव्यावर जाणार आहेत.ही बाब तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याने भोकर येथे देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज दि.२४ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी दिनी या दोघांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील सेवाकार्यासाठी भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या.
भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात राहून प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन जिद्द व परिश्रमाच्या बळावर भारत मातेच्या सेवार्थ संतोष गोविंद मेंदेवाड व दत्ता रोहिदास मानेबोईनवाड या तरुणांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याचा प्रयत्न केला.यात त्यांना यश आले असून भारतीय सैन्य दलात त्यांची नुकतीच निवड झाली आहे.लवकरच हे दोघे आपल्या कर्तव्यावर जाणार आहेत.त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार करुन पाठवणी करण्याच्या उदात्त हेतूने दि.२४ ऑक्टोंबर २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे देशप्रेमी नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे व ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड,सरपंच संघटनेचे भोकर तालुकाध्यक्ष माधव अमृतवाड,डॉ.अशोक माझळकर , पत्रकार मनोज गिमेकर,मारोती अंगरवार,मोहन राठोड,मल्लेश्वर दंतुलवाड, सुनिल मदनवाड,व्यंकट बतलवाड, पुंडलिक चिकलवाड यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित उपरोक्त मान्यवरांनी त्या दोघांचाही यथोचित सत्कार केला.तसेच मनोगत व्यक्त करुन दोघांनाही पुढील देशसेवाकार्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नामदेवराव आयलवाड म्हणाले की,प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत या तरुणांनी भारतीय सैन्य दलातून भारत मातेच्या रक्षणाचा व देश सेवेचा विडा उचलला आहे.त्यांच्या निवडीचा आम्हा सर्वांना अभिमान असून ग्रामीण भागातील अन्य तरुणांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा व आपल्या कुटूंबीयांचे,गावचे,राज्याचे आणि देशाचे नाव मोठे करावे.अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्या होतकरू तरुणांच्या पाठीशी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा सदैव राहतील.असे ते म्हणाले.







0 comments:
Post a Comment