भोकर प्र- अंबादास के एल बोयावार
भोकर : तालुक्यातील मौजे मातुळ येथील सकल मराठा समाज बांधवांनी 25 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोटरसायकल चा भव्य मोर्चा काढून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास सक्रिय पाठिंबा दर्शविला असुन मातुळ गावांमध्ये साखळी उपोषणासाठी बसण्याचे सकल मराठा समाज बांधवांनी निश्चित करून भोकर तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या स्तरावरून साखळी उपोषणाच्या काळामध्ये कुठलाही राजकीय पुढारी गावात येणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, जर उपोषण काळामध्ये कुठल्याही राजकीय पुढारी गावांमध्ये आला तर गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ही केली असुन या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक भोकर यांना देखील सकल मराठा समाज बांधव मातुळ यांच्या वतीने देण्यात आले आहे.निवेदन देताना मातुळ येथील आसंख्या मराठा समाज बांधव उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment